कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील ३४ जणांचे अहवाल प्राप्त
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात एकूण ३४ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून यात ४ रुग्ण बाधित आढळले आहे त्यात पढेगाव येथील ६० वर्षीय पुरुष तर अंचलगाव येथील येथील ४६ वर्षीय पुरुष तर कोपरगाव शहरातील इंदिरापथ येथील २९ वर्षीय पुरुष,तर जाणकीविश्व येथील ६४ वर्षीय पुरुष बाधित निघाले असल्याची माहिती माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांना अजून सतर्क होण्याची व कोरोना पासून बचाव करण्यासाठी संरक्षक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्याकडे दुर्लक्ष झाल्यास प्रशासन नाईलाजाने ताळेबंदीचा निर्णय घेऊ शकते याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात काल विक्रमी ८ रुग्ण आढळले होते त्या खालोखाल सोनारी व ब्राम्हणगाव येथे प्रत्येकी २ रुग्ण बाधित आढळले होते तर चांदेकसारे,येसगाव,टाकळी, येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळला असून कोपरगाव शहरात जानकीविश्व व सुभद्रानगर येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळल्याने कोपरगाव व तालुक्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले असताना आज सकाळी पुन्हा त्यात दत्तनगर येथील ३४ वर्षीय पुरुष तर भामा नगर येथील ३४ वर्षीय पुरुष असे दोन जण बाधित निघाले होते.त्या नंतर आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास हे अहवाल प्राप्त झाले आहे.पोहेगावात वारंवार विक्रमी रुग्ण आढळत असल्याने काल पासून हे गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे.
दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ३३४ इतकी झाली आहे.त्यात १९२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.२१ टक्के आहे.आतापर्यंत १ हजार ९८९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ७ हजार ९१६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १६.५७ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १३६ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ४१.४६ आढळला असल्याची माहितीही डॉ.फुलसुंदर यांनी शेवटी दिली आहे.
आज तब्बल २५ रुग्ण कोरोणा मुक्त झाले आहे.वर्तमानात उपचार चालू असलेले १६९असून
आत्ता पर्यंत बरे झालेले १६१ आहेत.तर
आत्ता पर्यंत मृत्यू ४ जणांचे झाले आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.२०% आहेत.कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांना अजून सतर्क होण्याची व कोरोना पासून बचाव करण्यासाठी संरक्षक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्याकडे दुर्लक्ष झाल्यास प्रशासन नाईलाजाने ताळेबंदीचा निर्णय घेऊ शकते याचे भान ठेवणे गरजेचे आहे.