जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

चासनळी शिवारात अपघात,एक ठार,एक जखमी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात असलेल्या चासनळी ग्रामपंचायत शिवारात देर्डे-कोऱ्हाळे मार्गे शिर्डी-लासलगाव रस्त्याने आपल्या विनाक्रमांकाच्या एच.एफ.डिलक्स या दुचाकीवरून पोहेगावकडून आपल्या गावी जात असताना दि.१४ जून रोजी दुपारी सव्वा वाजता समोरून येणाऱ्या पिकअप वरील चालकाने ( क्रं.एम.पी.१४ जी.सी.१९०९) जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात उपचार चालू असताना कुंभारी ता.निफाड येथील कचेश्वर भाऊराव घंगाळे (वय-५४) हे ठार झाले आहेत.तर त्यांच्या समवेत असलेले नातेवाईक बाळासाहेब नाना कोरडे हे गंभीर जखमी झाल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी यमाजी बाळासाहेब कोरडे (वय-३२) रा.चांदोली ता.निफाड जिल्हा-नाशिक यांचे वडील दि.१४ जून रोजी आपल्या वरील हिरो कंपनीच्या एच.एफ.डिलक्स या दुचाकीवरून पोहेगाव ता.कोपरगाव येथून शिर्डी-लासलगाव रस्त्याने आपल्या गावाकडे दुपारी सव्वा वाजता जात असताना चासनळी शिवारात समोरून वरील क्रमांकाची पिकअप भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने जात असताना त्याने या दुचाकीस जोराची धडक दिली त्यात फिर्यादीचे वडील बाळासाहेब नाना कोरडे हे गंभीर रित्या जखमी झाले व त्यांचे मावस मामा कचेश्वर भाऊराव घंगाळे रा.कुंभारी ता.निफाड यांचे निधन झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी यमाजी बाळासाहेब कोरडे (वय-३२) रा.चांदोली ता.निफाड जिल्हा-नाशिक यांचे वडील दि.१४ जून रोजी आपल्या वरील हिरो कंपनीच्या एच.एफ.डिलक्स या दुचाकीवरून पोहेगाव ता.कोपरगाव येथून शिर्डी-लासलगाव रस्त्याने आपल्या गावाकडे दुपारी सव्वा वाजता जात असताना चासनळी शिवारात समोरून वरील क्रमांकाची पिकअप भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने जात असताना त्याने या दुचाकीस जोराची धडक दिली त्यात फिर्यादीचे वडील बाळासाहेब नाना कोरडे हे गंम्भीर रित्या जखमी झाले व त्यांचे मावस मामा कचेश्वर भाऊराव घंगाळे रा.कुंभारी ता.निफाड यांचे उपचारा दरम्यान निफाड येथे निधन झाले आहे.नजीकच्या नागरिकांनी या अपघातग्रस्तांना उपचारार्थ तातडीने निफाड येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निफाड येथे उपचारार्थ हलविले होते.मात्र उपचार सुरू असताना कचेश्वर घंगाळे यांचे निधन झाले आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.१४३/२०२० भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ)(ब)१७७ प्रमाणे पिकअप वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सी.एम.तोर्वेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close