जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..त्या गावातील कोरोना रुग्णांचे अहवाल आले

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव ग्रामपंचायत हद्दीतील त्या संशयित नऊ जणांचे अहवाल आज आरोग्य विभागास प्राप्त झाले असून ते सर्व नोरांक आले सल्याची माहिती कोपरगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील तालुका प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.

काल वैजापूर मध्ये पुन्हा दोन रुग्ण आढळले आहे.कोपरगाव तालुका आता वैजापूरसह,राहाता,नाशिक,आदी सर्व बाजूनी घेरला आहे.मात्र प्रशासनाने आता पर्यंत आपल्या जीवाची बाजी लावत तालुका आतापर्यंत सुरक्षित राखला आहे.आज हे नऊ जणांचे अहवाल आल्याने प्रशासनांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.

राज्यात या विषाणूने ७० हजार ०१३ जणांना बाधा झाली आहे.तर या बाधेने २ हजार ३६२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १२० वर जाऊन पोहचली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.परवा रात्री गोधेगाव मधील संशयित ९ रुग्णाची भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय झाले होते.यातील पाच रुग्ण मोठ्या जोखमीचे असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनीं म्हटले होते.या पार्श्वभूमीवर हे श्राव त्या साठी अग्रक्रमाने नगर येथे तपासणीसाठी पाठवले होते.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने हा भाग पूर्ण बंद केला होता.त्यांचा अहवाल आज येणार असल्याने त्याकडे नागिकांचे लक्ष लागून होते.काल वैजापूर मध्ये पुन्हा दोन रुग्ण आढळले आहे.कोपरगाव तालुका आता वैजापूरसह,राहाता,नाशिक,आदी सर्व बाजूनी घेरला आहे.मात्र प्रशासनाने आता पर्यंत आपल्या जीवाची बाजी लावत तालुका आतापर्यंत सुरक्षित राखला आहे.आज हे नऊ जणांचे अहवाल आल्याने प्रशासनांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close