जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात बेशिस्त तरुणांवर केली कारवाई

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरंगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आपल्या तोंडाला मास्क न लावून नागरिकांच्या जीविताला धोका उत्पन्न निर्माण होईल असे वर्तन विनाकारण गर्दी केल्याच्या कारणावरून कोपरगाव शहर पोलिसानी टाकळी नाका या ठिकाणी मुर्शतपुर रहिवाशी असलेले तरुण कार्तिक संतोष जोगदंड,(वय-१६),गोकुळनागरी येथील तरुण तुषार भाऊसाहेब जगताप (वय-१६) व फरार झालेला तुषार महाले रा.येवला रोड कोपरगाव या तिघांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.तरीही काही तरुण व नागरिक या बाबतीत गंभीर व्हायला तयार नाही हि अत्यंत दुखदायी घटना मानावी लागेल.तालुका प्रशासन व शहर पोलीस आपल्या जीवाचे रान करून शहरातील नागरिकांची काळजी घेता असताना मोठ्या संख्येने नागरिकांनी सहकार्य केल्याने कोरोना साथ नियंत्रणात आली असताना आता पुन्हा रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे मात्र काही तरुण या बाबत अद्याप गंभीर व्हायला तयार दिसत नाही.

देशात कोरोना विषाणूने कहर केला आहे.अनेकांना आपल्या जीवाला हकनाक मुकावे लागत आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नगर जिल्ह्यात ३६ जण बाधित झाले आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.तरीही काही तरुण व नागरिक या बाबतीत गंभीर व्हायला तयार नाही हि अत्यंत दुखदायी घटना मानावी लागेल.तालुका प्रशासन व शहर पोलीस आपल्या जीवाचे रान करून शहरातील नागरिकांची काळजी घेता असताना मोठ्या संख्येने नागरिकांनी सहकार्य केल्याने कोरोना साथ नियंत्रणात आली असताना आता पुन्हा रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे मात्र काही तरुण या बाबत अद्याप गंभीर व्हायला तयार दिसत नाही.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी आपला खाक्या दाखवत टाकळी फाटा या ठिकाणी या तरुणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.१४७/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७१, प्रमाणे फिर्यादी पो.कॉ.सुरजकुमार जीवन अग्रवाल (वय-३२) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.या आधीही कोपरगाव पोलिसानी अनेक प्रतिष्ठीतांविरुद्ध कारवाई करून दणका दिला आहे त्यात आता या तीन तरुणांच्या कारवाईची भर पडली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close