जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शेतकऱ्यांचे भरणे होईपर्यंत आवर्तन सुरु ठेवा-या नेत्याची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला पाटबंधारे विभागाकडून १४ एप्रिल रोजी आवर्तन सोडण्यात आले असले तरी आज पर्यंत कोपरगाव तालुक्यात वितरीका सोडण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे आवर्तनाच्या कालावधीत सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ मिळावा यासाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे भरणे होईपर्यंत आवर्तन सुरु ठेवण्याच्या सूचना कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांना केल्या आहेत.

गोदावरी कालव्याच्या आवर्तनावर विविध गावातील पाणी योजना अवलंबुन आहे त्यामुळे सर्व पाणी योजनांचे गावतळी प्राधान्याने भरून द्यावीत.उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे फळबागा,ऊस,चारा पिकांना सिंचनाची नितांत गरज भासत आहे-आ.काळे

आ.काळे यांनी जलसंपदाला पाठवलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की,गोदावरी कालव्याच्या आवर्तनावर विविध गावातील पाणी योजना अवलंबुन आहे त्यामुळे सर्व पाणी योजनांचे गावतळी प्राधान्याने भरून द्यावीत.उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे फळबागा,ऊस,चारा पिकांना सिंचनाची नितांत गरज भासत आहे. गोदावरी कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरु असून गोदावरीचा डावा कालवा ३५० क्युसेस,उजवा कालवा ५५० क्युसेस व एक्स्प्रेस कालवा ८०० क्युसेसने वाहत आहे.आवर्तन सुरु झाल्यापासून आजपर्यंत राहाता विभागातील वितरिका १७ ते २० मधून जवळपास ४०० हेक्टरवरील क्षेत्र सिंचन पूर्ण झाले असून बऱ्याच क्षेत्रावरील सिंचन होणे बाकी आहे अशा परिस्थितीत वरच्या भागातील लाभधारक क्षेत्रातील सर्वच शेतकरी आवर्तनाची चातका प्रमाणे वाट पहात आहे. मतदार संघातील असंख्य लाभधारक शेतकऱ्यांचे भरणे बाकी आहेत.याची पाटबंधारे खात्याने दखल घेऊन जोपर्यंत सर्वच शेतकऱ्यांचे भरणे होत नाही तोपर्यंत आवर्तन सुरु ठेवावे गरज भासल्यास वाढीव पाणी मागणीचे नियोजन करावे.सर्वच शेतकऱ्यांचे भरणे पूर्ण होईल याची काळजी घ्यावी अशा सूचना आ.काळे यांनी शेवटी पत्रात पाटबंधारे विभागाला

दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close