जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

      ….’तो’ वाढीव कामाचा वाद थेट राज्य पातळीवीर ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
 

  कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नुकत्याच संपन्न झालेल्या मासिक बैठकीत प्रशासन काळात तीळवणी (शिरसगाव) उपबाजार येथे टाकण्यात आलेल्या मुरुमासह दगडी पिचिंगचे कामाचे १२ लाख रुपयांच्या बिलावरून सत्त्ताधारी गटातील दोन आजी माजी पदाधिकाऱ्यांत निर्माण झालेला वाद हा व्यापाऱ्यांनी आपल्या शेडसमोर टाकलेल्या मुरुमावरून निर्माण झाला असल्याची माहिती असून त्याचा ३.५० लाख रुपयांचा खर्च व्यापाऱ्यांनी मागितल्याने व या तक्रारी थेट मुख्यमंत्र्यपर्यंत गेल्याने हा घोळ निर्माण झाल्याची माहिती हाती आली असली यातील टक्का हाही महत्वाचा घटक असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

  

दरम्यान एका माहितीनुसार स्थानिक शिरसगाव आणि तीळवणी येथील काही ग्रामस्थानीं या कामाची तक्रार थेट मुख्यमंत्री आणि सहकार विभागाचे जिल्हा निबंधक यांचेकडे केलेली आहे.त्यात विरोधी संचालकांनी प्रमुख पदाधिकारी यांना सदर बिलाची जोखीम घेतल्यास व अंगलट आल्यास आपण जबाबदार राहणार नाही असा इशारा दिला असल्याने पदाधिकारी व प्रशासन आदींनी आपले अंग काढून घेतले असल्याने हा घोळ निर्माण झाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध संपन्न होऊन वर्षाचा कालावधी उलटला असून वर्तमानात सभापतीपदी माजी आ.स्नेहलता कोल्हे गटाचे संचालक साहेबराव रोहोम यांची नियुक्ती झालेली आहे.त्या पूर्वी या ठिकाणी कोरोना काळात प्रशासक असल्याने बरेच दिवस प्रशासक राज होते.या कालखंडात तालुक्यातील तिळवणी (शिरसगाव) येथील दोन एकर क्षेत्रातील उपबाजारात पावसाळ्यात आपला शेतमाल आणल्यावर या तीळवणी उपबाजार परिसरात दलदल होऊ नये म्हणून सुमारे ०८ लाख रुपयांचा मुरूम टाकण्याचे काम सत्ताधारी गटाचे कोपरगाव शहरातील माजी नगराध्यक्ष यांचे सुपुत्रास दिले होते.विशेष म्हणजे सदर कामात अनेक निविदा येउन त्या जवळपास ३०/३५ टक्के किमान दराच्या होत्या.तर सर्वोच्च किमान दराची निविदा हि ३९ टक्क्यांची कोपरगावातील होती.अर्थातच एवढ्या निचांक्की दरात संबंधितास काम कसे परवडू शकते असा सवाल निर्माण झाला आहे.मात्र रिकाम्या वेळेत आपली स्वतःची मशिनरी असल्याने किमान भाडे जरी मिळाले तरी बस अशा अर्थाने आपण ते काम स्वीकारले होते अशी माहिती हाती आली आहे.यातून काम सत्ताधारी गटाच्या युवा कार्यकर्त्यांस मिळाले होते.मात्र सदर काम होऊन दिड वर्षाचा कालावधी होऊनही त्या कामाचे बिल निघत नसल्याने सदर ठेकेदार हातघाईवर आले होते.त्यातून बाजार समिती पदाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपूरावा करूनही बिल निघत नसल्याने संबंधित ठेकेदाराने वरिष्ठ नेत्यांकडे वर्णी लावली होती.त्यानंतर सदर बिल देण्याचे आदेश झाले होते.त्यामुळे मोठ्या अपेक्षेने ठेकेदार सदर बैठकीस गेला होता.त्यावर बाजार समितीच्या नुकत्याच शुक्रवार दि.२२ मार्चच्या संपन्न झालेल्या बैठकीत काही विरोधी सदस्यांनी त्यास हरकत घेतली होती.त्यामुळे वरिष्ठ पदाधिकारी यांनी टाळाटाळ केली होती.त्यावरून सत्ताधारी पदाधिकारी व ठेकेदार पितापुत्र यांच्यात वाढीव बिलावरून मोठे वादंग निर्माण झाले होते.प्रकरण एवढ्यावर थांबले नाही ते होळीच्या आधीच अकाली शिमग्यावर आले होते.मात्र सदर बिल हे व्यापाऱ्यांनी सदर काम वेळेत न झाल्याने त्यांनी आपली पदर मोड करून आपल्या शेडसमोर मुरूम व दगडी पिचिंग करून घेतल्याने त्यांनी त्याचा मोबदला मागितला होता अशी ताजी माहिती हाती आली असली तरी त्यात दोन मत प्रवाह आहे.

दरम्यान एका माहितीनुसार व्यापाऱ्यांनी आपल्या शेडसमोर टाकलेल्या मुरूम आणि दगडी पिचिंगची छोटी निविदा बाजार समितीमार्फत काढून आपले ३.५० लाख रुपयांचे बिल काढून घेतले असल्याची माहिती स्थानिक व्यापारी यांनी दिली आहे.त्यामुळे यातील गौड बंगाल आणखी वाढले आहे.

    मात्र सदर बिल देण्यात पदाधिकारी व प्रशासन यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप संबंधित ठेकेदार यांनी केला आहे.यात त्यांचा टक्का सामील नसल्याने खरा अडथळा आल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.यातून आता सत्ताधारी गटाचे माजी आ.कोल्हे गटाचे नेते व विरोधी आ.आशुतोष काळे गट काय भूमिका घेतो यावर सर्व काही अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

    दरम्यान एका माहितीनुसार स्थानिक शिरसगाव आणि तीळवणी येथील काही ग्रामस्थानीं या कामाची तक्रार थेट मुख्यमंत्री आणि सहकार विभागाचे जिल्हा निबंधक यांचेकडे केलेली आहे.त्यात विरोधी संचालकांनी प्रमुख पदाधिकारी यांना सदर बिलाची जोखीम घेतल्यास व अंगलट आल्यास आपण जबाबदार राहणार नाही असा इशारा दिला असल्याने पदाधिकारी व प्रशासन आदींनी आपले अंग काढून घेतले आहे.त्यामुळे प्रमुख पदाधिकारी सदर प्रकरण आपल्यावर शेकावयास नको म्हणून या बिलास टाळाटाळ करत असल्याची माहिती आहे.

  दरम्यान एका माहितीनुसार व्यापाऱ्यांनी आपल्या शेडसमोर टाकलेल्या मुरूम आणि दगडी पिचिंगची छोटी निविदा बाजार समितीमार्फत काढून आपले ३.५० लाख रुपयांचे बिल काढून घेतले असल्याची माहिती स्थानिक व्यापारी यांनी दिली आहे.त्यामुळे यातील गौड बंगाल आणखी वाढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close