जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

वाळूचोरांची मुजोरी,वाळू उपसा प्रतिबंधक पथकास शिवीगाळ,तहसिलदारांस दमदाटी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध असतांना कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वनीकरण विभागानजीक शनिवार दि.२३ मार्चच्या रात्री १०.३० ते ११.३० वाजेच्या सुमारास एक टाटा कंपनीचा टेंपो अवैध वाळू वहातूक करताना आढळून आल्याने वाळू उपसा प्रतिबंधक पथकाने त्यास हटकले असता आरोपी बाबासाहेब शिवाजी जाधव व अझर इस्माउद्दीन शेख आदींनी शिवीगाळ करून दमदाटी केली आहे.व अन्य सहकाऱ्यास बोलावून घेऊन महसुली कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व तेथे बोलावलेल्या तहसीलदार संदीप भोसले यांनाही दमदाटी करून,”तुम्ही टेंपो लगेच सोडा अन्यथा तुम्हाला नोकरी करून देणार नाही” अशी धमकी दिली आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   

कुंभारी येथील हद्दीत वरील आरोपी बाबासाहेब शिवाजी जाधव यासह तिघांनी महसुली कर्मचाऱ्यांना शनिवार दि.२३ मार्च रोजी रात्री १०.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान शिवीगाळ करून दमदाटी केली आहे.व अन्य सहकाऱ्यास बोलावून घेऊन महसुली कर्मचाऱ्यास व तेथे बोलावलेल्या कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले यांनाही दमदाटी केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

राज्यातील वाळू लिलाव व बेकायदा वाळू उपसा यामागील राजकारण व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवे वाळू धोरण दि.०१ मे २०२३ पासून हाती घेतले होते.त्याची अंमलबजावणी होण्यास काही महिने लागले ती काही महिने झाले नाही तोच सरकारने आचारसंहिता लागण्या आधी बेसुमारीत्या वाढवले असून आत अधिकृत वाळू जवळपास ४ हजार ५०० रुपया पर्यंत पोहचली आहे.त्यामुळे आमच्या प्रतिनिधीने आधीच सांगील्याप्रमाणे सरकारचा फुगा फुटला आहे.यात सामान्य माणसाला सलवतीच्या दरात वाळू मिळण्याऐवजी संबंधित मंत्री आणि महसुली अधिकाऱ्यांची चांदी झाल्याचे दुर्दैवाने नागरिकांना पाहायला मिळाले आहे.व सहाशे रुपये दराची वाळू हि दिवास्वप्न ठरले असल्याने नागरिकांत मोठी नाराजी आहे.त्यामुळे स्वाभाविकच चोरटी वाळूस बळ मिळाल्याचे दिसून येत आहे.कोपरगाव,राहाता तालुका त्यास अपवाद नाही.त्यामुळे चोरटी वाळू हि कॅमेरे बंद करून किंवा ते फिरवून चालुच राहिली असल्याचे दिसून आले आहे.


   याबाबत सुरेगाव,सांगवी भुसार  येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते आदींनी अनेक वेळा निवेदने देऊनही फारसा फरक पडला नाही.अशीच एक घटना उघड झाली असून यात कुंभारी येथील हद्दीत वरील आरोपी बाबासाहेब शिवाजी जाधव रा.शिंगणापूर व अझर इस्माउद्दीन शेख रा.गांधीनगर,कोपरगाव तुषार दिपक दळे आदींनी आपला टेंपोच्या (क्रं.एम.एच.०४ ई.एल.९३३५) सहाय्याने अवैध वाळू उपसा करून वन विभागाच्या जमिनिजवळून जात असताना त्यांना शनिवार दि.२३ मार्च रोजी रात्री १०.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान अडवले व या पथकाने आपली ओळख दाखवली असता त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली आहे.व अन्य सहकाऱ्यास बोलावून घेऊन महसुली कर्मचाऱ्यास व तेथे बोलावलेल्या कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले यांनाही दमदाटी करून,”तुम्ही पैसे घेत नाही का ? तुम्ही; आमचा पकडलेला टेंपो तहसील कार्यालयात सोडून द्या; नाही तर तुम्हाला अन्यथा तुम्हाला नोकरी करून देणार नाही” अशी धमकी दिली आहे.व फिर्यादी धोत्रे येथील तलाठी गणेश दिलीप वाघ (वय-३९) यांना धक्काबुक्की केली आहे.व त्यांच्या ताब्यातील टेंपो अनाधिकाराने घेऊन जाण्याच्या प्रयत्न केला आहे.वाळू उपसा प्रतिबंधक पथकाने पोलिसांना बोलावल्यावर आरोपीनी घट्नास्थळावरून पोबारा केला आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  दरम्यान घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने,पोलीस निरीक्षक संदीप कोळी,पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन आदींनी भेट दिली आहे.

  या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्यादी तालाठी गणेश वाघ यांनी वाहन चालकासह आरोपी विरुद्ध गुन्हा १०२/२०२४ भा.द.वि.३७९,३५३,३३२,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध दाखल केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक वांढेकर हे करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close