जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

….या ठिकाणाहून त्र्यंबकेश्वर साठी होणार दिंडी रवाना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर येथील रोकडेश्वर महाराज मंदिर ते नाशिक त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्ती महाराज यांचे समाधी मंदिर या दरम्यान सोमवार दि.२९ जानेवारी सकाळी १० वाजता ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पायी दिंडीचे आयोजन केले असल्याची माहिती अड्. प्रमोद जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या दिंडीचे भाविकांनी स्वागत केले आहे.

संत निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीस त्रंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाशझोतात आली असे मानले जात असले तरी हि समाधी काही काळानंतर लुप्त झाली होती.ती संत गंगागिरी महाराज यांनी प्रकाश झोतात आणली असे मानले जाते.त्याचे अनेक शिष्य आपल्या दिंड्या घेऊन जात आहे.त्यात श्री क्षेत्र भऊर येथून ह.भ.प.संजय महाराज यांची दिंडी जात असते.

श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन २८ कि.मी.अंतरावर पश्चिमस्थित आहे.गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसलेले आहे.या जवळच ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला.त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे.



संत निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य एकादशीला असते ती.२३ जुन १२९७ अशी मानली जाते.संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य ११ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली.ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला.तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला.यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला.संत निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीस त्रंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाशझोतात आली असे मानले जात असले तरी हि समाधी काही काळानंतर लुप्त झाली होती.ती संत गंगागिरी महाराज यांनी प्रकाश झोतात आणली असे मानले जाते.त्यामुळे या ठिकाणी वारकरी संप्रदाय आणि भागवंत धर्माचे वारकरी दरवर्षी दिंड्या घेऊन येत असतात.यावर्षी हा उत्सव बुधवार दि.०७ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी राज्याच्या विविध भागातून दिंड्या मार्गस्थ झाल्या आहे.यातील एक दिंडी ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे मार्गदर्शनात श्री क्षेत्र भऊर ता.वैजापूर येथून सोमवार दि.२९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता रवाना होत असून त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रमोद जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

श्री क्षेत्र अंदरसुल येथील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा प्रसंगी उजवी कडून ह.भ.प.संजय महाराज जगताप दिसत आहे.

   सदर दिंडीचा पहिला मुक्काम हा कोकमठाण येथील सावळेराम देवराव रक्ताटे यांचेकडे तर दि.३० जानेवारी रोजी दुसरा मुक्काम पोहेगाव येथील मधुकर पोटे यांचेकडे,दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी सुभाष नामदेव आले रा. माळेवाडी येथे होणार आहे.तर दि.०१ फेब्रुवारी रोजी तिसरा मुक्काम हा सिन्नर येथील ब बाळनाथ निवृत्ती पगार यांचेकडे होणार आहे.तर चौथा मुक्काम ०२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी,’तरुण महाराष्ट्र मित्र मंडळ’ नाशिक रोड यांचेकडे होत आहे.तर पाचवा मुक्काम हा दि.०३ फेब्रुवारी रोजी सोपान रायभान जगताप सातपूर या ठिकाणी होत आहे.दि.०४ फेब्रुवारी रोजी पाचवा मुक्काम तळवाडे येथे भाऊसाहेब बोडखे यांचेकडे होणार आहे.तर दि.०५ फेब्रुवारी रोजी सहावा मुक्काम हा त्र्यंबकेश्वर येथे भास्कर अंबरगिरी बाबा,गोरखनाथ काशिनाथ भारती यांचेकडे होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.सातवा मुक्काम हा त्र्यंबकेश्वर येथील कैलास शिनगर यांचे कडे होणार असल्याची माहिती आहे.

  दरम्यान याच दिवशी मंगळवार दि.०६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६ वाजता ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे  किर्तन संपन्न होणार आहे.तर बुधवार दि.०७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९ वाजता ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे उपस्थित भाविकांसमोर काल्याचे हरी किर्तन संपन्न होणार आहे.सदर ठिकाणी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण अड्.प्रमोद मुरलीधर जगताप भऊरकर यांचेकडून केले जाणार आहे.

  या दिंडी सोहळ्यासाठी ह.भ.प.आप्पासाहेब मुके,भाऊसाहेब जगताप,कृष्णा जगताप,नानासाहेब जगताप,सोपान नवले,भागवत शिनगर,अंकुश गायकवाड,हरिभाऊ महाराज गायकवाड,किसन जावळे,अशोक अण्णा,बाळासाहेब गुंजाळ,योगेश भुमरे,कोकाटे बाबा,बाळासाहेब पांगारकर,संतोष पांगारकर,गावकरी खोपडी,कैलास भाबर,सुरेश पोटे,चंद्रभान झाडे,अशोक वरकड,नानासाहेब ठुबे,संजय बोखडे,रवींद्र जगताप,रावसाहेब जगताप आदींचे योगदान लाभणार असल्याची माहिती अड्.जगताप यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close