जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव मतदार संघात औद्योगिक केंद्र उभारा-…यांची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तरुणाईला रोजगार उपलब्ध होवून मतदार संघाच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात औद्योगिक केंद्र उभारावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

दरम्यान निळवंडे कालवा कृती समितीने रस्त्यावरील व न्यायिक संघर्ष करून निळवंडेचे पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी कंबर कसली असून त्याची उच्च न्यायालयाच्या आदेशाने चाचणी झाली आहे.आता सदरचे पाणी दुष्काळी भागास येणार असल्याचे स्पष्ट झाले असताना कोपरगावनजीकची मोकळी जागा सोडून हि मागणी होत असल्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव तालुक्यात औद्योगिक क्षेत्रन निर्माण करावे यासाठी अनेक दिवसापासून नागरिकांची मागणी आहे.त्यासाठी माजी नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी आपल्या काळात सह्यांची मोहीम राबवली होती.शिवाय कोपरगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या जागेत ती उभारावी अशी मागणी भाजप काळात लावून धरली होती.मात्र अद्याप ती फळाला आलेली नाही.त्यानंतर प्रस्थापित नेत्यांनी कायमच या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.आता वर्तमान राष्ट्रवादीचे आ.काळे यांनी समक्ष भेटून हा प्रश्न राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे कडे प्रथमच उपस्थित केला आहे.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,”कोपरगाव मतदार संघ अवर्षणग्रस्त असून जिरायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.मतदार संघातील तरुणाच्या हाताला रोजगार नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जावे लागते.त्यामुळे मतदार संघात एम.आय.डी.सी.झाल्यास बेरोजगार तरुणाईच्या हाताला रोजगार उपलब्ध होवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

औद्योगिक केंद्र उभारण्यासाठी आवश्यक असलेली जमीन कोपरगाव मतदारसंघात उपलब्ध असून रेल्वे स्टेशन, विमानतळ,समृद्धी महामार्ग,सिन्नर-शिर्डी महामार्ग,नागपूर-मुंबई एक्स्प्रेस हायवे व प्रस्तावित सुरत-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग कोपरगाव मतदार संघालगत असलेल्या संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागातून जात असल्यामुळे एम.आय.डी.सी.उभारण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचा दावा केला आहे.(,मात्र कोपरगाव तालुक्यातून सुरत-चेन्नई मार्ग जात नाही) एम.आय.डी.सी.निर्मितीमुळे कोपरगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार तर उपलब्ध होईल त्याचबरोबर मतदार संघाच्या जिरायती भागाचा आर्थिक विकास साधला जाणार आहे.त्यामुळे एकूण परिस्थितीचा विचार करून कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागात एम.आय.डी.सी.उभारण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close