शैक्षणिक
पुणे येथे पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा या संस्थेच्या बी.ए.स्तरीय पंडित परीक्षा व एम.ए.स्तरीय पदम या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी व विद्याथिनींचा पदवी प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पुणे येथील एस.एम.जोशी फौडेंशनच्या सभागृहात पार पडला आहे.
या वेळी या परीक्षा समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम पगारे सर यांनी परीक्षेचे निवेदन करून या पदवी परीक्षांचे महत्व विषद केले आहे.
या प्रसंगी त्यांचा आज पर्यंतच्या कार्या बाबत विषेश पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.या वेळी महाराष्ट्रातील ‘दै.आज का आनंद’ या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक आनंद आगरवाल,महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे अध्यक्ष व प्रसिद्ध विचारवंत,क्राँंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आ. ऊल्हासपवार,संस्थेच्या कार्याध्यक्षा डाॅ.विणाताई मनचंदा,प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ श्री गजरे,सचिव श्री इनामदार,पुरुषोत्तम पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.