जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तीन वाहनांची जोराची धडक,दोन गंभीर जखमी,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत असलेल्या झगडे फाटा ते नाशिक जाणारे रस्त्यावर ट्रक,कंटेनर व आयशर टेम्पो अवजड वाहनांची समोसमोर धडक होऊन अपघातात आयशर टेम्पो चालक अब्दुल कलाम शेख (वय-५०)रा.कांदिवली मुंबई व मधुकर कारभारी जाधव (वय-३१)रा.शिउर बंगला जिल्हा.छ.संभाजीनगर हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.

दरम्यान या घटनेतील एका चालकाचा उजवा हात कोपरापासून तुटून पडला असल्याची धक्कादायक माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली आहे. सदर अपघात सकाळी ०६.३० वाजेच्या सुमारास घडला आहे.

दरम्यान या घटनेत मात्र आयशर जखमी अब्दुल कलाम शेख व मधुकर जाधव यांना नजीकच्या नागरिकांनी रुग्णवाहिकेची साहाय्याने कोपरगाव नजीक असललेल्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

दरम्यान याबाबत अधिकची माहिती समजू शकली नाही.याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.याबाबत जखमींना तालुका पोलिसांनी कोपरगाव नजीक असललेल्या सद्गुरू जनार्दन स्वामी रुग्णालयात भरती केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close