जाहिरात-9423439946
शैक्षणिक

….या संस्थेचे विद्यार्थी हे भारत देशाचे सुजाण नागरिक बनतील-तहसिलदार बोरुडे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

बाल वयात विद्यार्थ्यांमधील गुण विकसित होत असतात.आजचा समताचा विद्यार्थी उद्या सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय,सहकार क्षेत्रात स्वतःमधील विकसित झालेल्या नेतृत्व गुणांनी प्रगती करणार असून भारत देशाचा सुजाण नागरिक बनतील असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्याचे तहसिलदार विजय बोरुडे यांनी कोकमठाण येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“विद्यार्थ्यांच्या अंगी लोकशाही मूल्यांची रुजवण व्हावी यासाठी विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांसाठी स्कूल अंतर्गत निवडणूक घेण्यात आली होती.निवडणूक समिती मार्फत विद्यार्थ्यांमधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले,त्यांची मुलाखत घेण्यात आली आणि आज शपथ घेऊन पद ग्रहण करत विविध पदांवरून त्यांची जबाबदारी देखील समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी पार पाडणार आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यावेळी पद्ग्रहण समारंभात बोलताना ते बोलत होते.

सदर प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,विश्वस्त स्वाती कोयटे,समता प्राचार्य,शिक्षक,विद्यार्थी बहुसंख्यने उपस्थित होते.

समता स्कूलच्या इ.९ वी तील अजिंक्य वठोरे याची मुलांमध्ये तर मुलींमध्ये अनुष्का ठोळे हिची मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.रुपल पाटील,शार्विल शिरोडे,मदनलाल लोंगणी, जिया बोथरा,भावेश अग्रवाल,आरुष सोनी,साई तनपुरे,यश दिवेकर तर इ.८ वी तील राजवीर आढाव,नूतन लाहोटी,दर्शिल अजमेरे,अदिती सोनवणे,अन्वी उंबरकर,अर्निशा कोठारी,मुक्ता मुंजे, आर्यन कुमार,प्रथमेश भट्टड,गिरिजा निर्मळ,ईश्वरी गोडसे,स्नेहा गुजराणी या विद्यार्थी-विद्यार्थिनींची विविध समित्यांवर निवड करण्यात आली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २५ ऑगस्ट २०२२ रोजी तहसिलदार विजय बोरुडे व कोपरगाव तालुका सिंधी महिला मंडळाच्या अध्यक्षा सिमरन खुबानी व मान्यवरांच्या हस्ते समता स्कूलच्या विद्यार्थ्यांना शपथ देऊन शपथ ग्रहण सोहळा पार पडला आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य समीर आत्तार यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका शोभा गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली इ.९ वी तील विद्यार्थिनी अनुष्का जपे व वृष्टी कोठारी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख रोहित महाले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार शिक्षिका चैताली पटारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close