जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

ज्ञानी माणसासोबतच समाजाला गुणी जणांची गरज-मुख्याधिकारी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

“ज्ञानी माणसे समाजासाठी आवश्यक असली,तरी ज्ञानी माणसे-सोबतच गुणी माणसेही आवश्यक असतात,तरच मानवी मूल्यांचे जतन करता येऊ शकते,त्यामुळेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ज्ञानप्राप्ती करण्याबरोबरच आपल्या अंगी असणा-या गुणांची जपणूक करावी” असे प्रतिपादन कोपरगांव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी येथे कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आपण अध्यक्ष झालो त्यावेळी १२०० विद्यार्थी महाविद्यालयात शिकत होते.आज ही संख्या ०७ हजार झाली आहे,महाविद्यालयात आज अत्याधुनिक सर्व सेवा उपलब्ध झाल्या असून,सध्या स्पोर्टस क्लब सुरू केला आहे,त्याला गावक-याचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.लवकरच महाविद्यालयाच्या नविन सात मजली इमारतीचे काम सुरू करण्यात येत असून,कोपरगांवात प्रथमच शुटींग रेंज व स्पोर्ट अकॅडमी सुरू करीत आहोत”-अशोक रोहमारे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी.

कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ त्यांच्या शुभहस्ते मोठ्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे होते.

सदर प्रसंगी कोपरगांव नगरपालिकेच्या उप-नगराध्यक्षा श्रीमती मीनल खांबेकर,संस्थेचे सचिव अॅण्ड संजीव कुलकर्णी,संस्थेचे विश्वस्त संदिप रोहमारे,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोरोना काळात आम्ही प्रशासनात काम करीत असताना आमच्यावर ताण होता.मात्र अनेकांकडे पैसे असूनही मानवी मूल्यांचा अभाव जाणवला.त्याचमुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानी होण्या-बरोबरच गुणी व्हावे,आपले ध्येय व जीवनमूल्ये निश्चित करावी,आज आपल्या महाविद्यालयात तालुक्यात नसतील एवढी संशोधन केद्रें आहेत.त्यात संशोधन करणाज्या विद्यार्थ्यांनी आपले संशोधन समाजापयोगी कसे हाईल,त्याची दक्षता घ्यावी.जीवनात आपणास जे स्वप्न बघतो,ते पूर्ण करताना ज्यांनी आपली मदत केली,त्या आई, वडिल,शिक्षण,आपली भूमी यांची आठवण ठेवावी”
सदर प्रसंगी पद्मकांत कुदळे,माजी उपनगराध्यक्ष श्रीमती मीनतलाई खांबेकर,अशोक रोहमारे आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

माजी उपनगराध्यक्ष मीनल खांबेकर म्हणाल्या की,”माझे पती या महाविद्यालयाचे विश्वस्त होते,त्यावेळी मी अनेकदा त्यांच्या सोबत येत असत,त्यासर्व आठवणी आजही ताज्या आहेत.त्यामुळे त्यांनी अधिक न बोलता यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत थांबणे पसंत केले आहे.

सदर प्रसंगी शौक्षणिक,क्रीडा,सांस्कृतिक आदी क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देवून प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. तसेच पी.एच.डी. ही पदवी व राष्ट्रीय व राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार झालेल्या प्रा. डॉ.के.एल.गिरमकर,प्रा.डॉ.बी.डी.गव्हाणे,प्रा.डॉ.एस.बी.कुटे,प्रा.डॉ.संजय दवंगे,प्रा.डॉ.व्ही.सी. ठाणगे,प्रा.डॉ.एन.आर.दळवी,प्रा.डॉ.एस.एल.अरगडे,प्रा.डॉ.एस.जी.कोंडा,प्रा.डॉ.एस.बी.खोसे, प्रा.डॉ.आर.ए.जाधव,प्रा.वाय.पी.शिंदे,प्रा.डॉ.विठ्ठल लंगोटे,या प्राध्यापकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तावित करतांना प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख सर्वांसमोर कथन केला.वार्षिक अहवालाचे वाचन प्रा.डॉ.वसुदेव साळुंके व एम.एम.भोंडवे यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.एस.के.बनसोडे व श्रीमती.एम.पी.निळेकर,प्रा.नीता शिंदे,श्री एम.व्ही.कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर सोनवणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close