जाहिरात-9423439946
धार्मिक

मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारणार-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हि महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी असून मंगळवेढा येथे महाराष्ट्र शासनाने महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारण्यासाठी ५२ एकर जागा देऊन १०० कोटी रुपयांचा निधी २०१६ साली देण्याची पोकळ घोषणा केली होती.त्यामुळे आता महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाज बांधव मंगळवेढा येथे स्वखर्चाने महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाथर्डी येथील जिल्हाध्यक्ष व अहमदनगर जिल्हा लिंगायत संघर्ष समितीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी दिली आहे.

“गेली अनेक वर्ष मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यात यावे हि सर्वच वीरशैव बांधवांची इच्छा असूनही शासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.आतापर्यंत शासनाने या मागणीच्या अनुषंगाने दोन समित्या नेमल्या त्या समित्या बरखास्त केल्या.आता कोणतीही समिती न नेमता यापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीमध्ये स्मारक उभारावे अन्यथा महाराष्ट्राच्या विविध भागातून वीरशैव लिंगायत समाज बांधव २१ ऑगस्ट रोजी पदयात्रा नेऊन मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारतील”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,राज्य पतसंस्था फेडरेशन.

कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समितीच्या नगर जिल्हा पदग्रहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनीं कोयटे,युवा अध्यक्ष प्रदीप साखरे,नाशिक जिल्हाध्यक्ष संदीप झरेकर,नगर जिल्हाध्यक्ष संतोष जिरेसाळ,धुळे जिल्हाध्यक्ष नितीन लिंगायत,जेष्ठ नेते प्रकाशअप्पा साबरे,कार्याध्यक्ष जयंत लोहारकर,उपाध्यक्ष पदमाकर साखरे, सेक्रेटरी सुधीर भुसारे,जेष्ठ नेते गोपीनाथ निळकंठ,रत्नाकर साखरे व नवनिर्वाचित लिंगायत संघर्ष समिती नगर जिल्हा,संगमनेर,पाथर्डी,नेवासा,शिर्डी,कोपरगावचे पदाधिकारी व समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.

या प्रसंगी चंद्रशेखर दंदणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,”महाराष्ट्र शासनाने मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे भव्य स्मारक उभारणीसाठी नाशिक जिल्हयातून हजारो वीरशैव बांधव मोठ्या संख्येने मंगळवेढा या ठिकाणी उपस्थित राहतील.तर अनिल चौगुले म्हणाले कि,मंगळवेढा येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने वीरशैव समाजबांधव त्या ठिकाणी उपस्थित राहतील.ज्या प्रमाणे लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आले होते,त्याप्रमाणे महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल.

सदर प्रसंगी सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,क्रीडा,वैद्यकीय यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वीरशैव समाज बांधवांचा सत्कार महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यात चांदवड येथील चांदवड मर्चंट को-ऑप.बँकेवर नवनिर्वाचित संचालक म्हणून निवड झालेले सुनील कबाडे,नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनवर सहसचिव म्हणुन निवड झालेले चंद्रशेखर दंदणे,लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी निवड झालेले अनिल चौगुले,मनमाड लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी निवड झालेले गणेश देशमुख,कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करून मानवतेची सेवा केल्याबद्दल डॉ.योगेश झाडबुके धुळे,कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेले गोपीनाथ निळकंठ यांचा गौरव करून सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीचे गोपीनाथ नीळकंठ यांनी केले.पदग्रहण समारंभाचे सूत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार लिंगायत संघर्ष समितीचे प्रदीप साखरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close