शैक्षणिक
सी.बी.एस.सी.परीक्षेत…या विद्यालयाचे यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूलने सलग दहाव्या वर्षी यशाची लक्षणीय यश संपादन केले असून सी.बी.एस.ई.इ.१० वी परीक्षेत ९२ टक्के विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा अधिक गुण मिळवले आहे तर ५० टक्के विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवत नवी उंची गाठली आहे.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) यंदापासून ‘टू बोर्ड परीक्षा’ धोरण लागू केले आहे.त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी अतिरिक्त परीक्षा देता येणार आहे. या धर्तीवर सीबीएसई मंडळाने १५ एप्रिल रोजी दहावीच्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला.या परीक्षेचा निकाल ९३.७० टक्के इतका लागला आहे.

कु.राजेश्वरी सुरेखा चैतन्य तांबे,द्वितीय क्रमांक.
या परीक्षेमध्येही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असल्याचे दिसून आले आहे.मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९९ टक्के,तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.६० टक्के इतके आहे.कोपरगाव तालुक्यातील समता इंटरनॅशनल स्कूलने यात चांगले यश मिळवले आहे.समता इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई इ १० वी परीक्षेत आर्या दीपिका राहुल सांड या विद्यार्थिनीने ९९ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर राजेश्वरी सुरेखा चैतन्य तांबे हिने ९८ % गुणांसह द्वितीय स्थान पटकावत सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले.

यासह दृष्टी पुनम खुशाल ठाकूर यांनी ९७ % गुण मिळवत तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले. तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) विषयात ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली असल्याची माहिती समताचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक ओमप्रकाश कोयते,प्राचार्य समीर अत्तार,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.



