जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालयाच्या ११ वी तसेच  १२ वी वर्गाच्या  वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा पालक मेळावा प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला आहे.पालक मेळाव्याचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे हे होते.

   अनेकदा महाविद्यालयीन वयात मुले घरात जास्त संवाद साधत नाहीत.मेळाव्यामुळे पालकांना त्यांचा पाल्य महाविद्यालयात कसा वागतो हे समजते.शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांच्यात एक विश्वासाचे नाते तयार होते,जे विद्यार्थ्याच्या मानसिक विकासासाठी गरजेचे असते.हिच गरज ओळखून श्री.सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयात नुकताच विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला आहे.

   महाविद्यालयामध्ये पालक-शिक्षक मेळावा आयोजित करणे ही केवळ एक औपचारिकता नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ती एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे.शालेय पातळीवर पालक मेळावे नियमित होतात,परंतु महाविद्यालयीन स्तरावरही त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.पालकांना आपल्या पाल्याच्या गुणांची,वर्गातील उपस्थितीची आणि शैक्षणिक प्रगतीची अचूक माहिती मिळते.विद्यार्थी अभ्यासात कुठे मागे पडत आहे किंवा त्याला कोणत्या विषयात अडचण आहे,यावर शिक्षक आणि पालक एकत्र येऊन तोडगा काढू शकतात.अनेकदा महाविद्यालयीन वयात मुले घरात जास्त संवाद साधत नाहीत.मेळाव्यामुळे पालकांना त्यांचा पाल्य महाविद्यालयात कसा वागतो हे समजते.शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांच्यात एक विश्वासाचे नाते तयार होते,जे विद्यार्थ्याच्या मानसिक विकासासाठी गरजेचे असते.हिच गरज ओळखून श्री.सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयात नुकताच विद्यार्थी पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला आहे.
   यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य रविंद्र हिंगे,प्रज्ञा वर्पे,माधव रेवगडे,पालक प्रतिनिधी किरण मराठे,प्रीती थोरात,मनीषा ढवळे,एकनाथ संवत्सरकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकांनी काही महत्त्वपूर्ण  सूचना मांडून आपले मनोगत व्यक्त केले आहे.यावेळी विविध प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना आपले विभाग,विषय आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.

  

   यावेळी प्राचार्य डॉ.माधव सरोदे म्हणाले की,“आजच्या बदलत्या काळात विद्यार्थी-पालक परिसंवादाची गरज अधिक वाढली आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालय आणि पालक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद असणे आवश्यक आहे.वाणिज्य शाखा ही केवळ आर्थिक विचार शिकवणारी शाखा नसून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता,आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करणारी शाखा आहे”असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

   यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख शांतीलाल अग्रवाल  यांनी केले तर मेळाव्यासाठी पालक,विद्यार्थी कनिष्ट विभागातील शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान ढगे व श्रीम.ज्योती लामखडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुशील सोनोने यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close