जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयाच्या,’टास्क फोर्स’ ची समन्वयक बैठक!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  “के.जे.सोमैया महाविद्यालयात आगामी 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारच्या स्टार कॉलेज प्रोग्राम अंतर्गत ‘डीबीटी स्टार कॉलेज सहाय्य प्राप्त महाविद्यालयांच्या टास्क फोर्स ची समन्वयक बैठक आणि 7 वी आढावा बैठक’ होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

  “स्टार कॉलेज प्रोग्राम अंतर्गत सहाय्य प्राप्त महाविद्यालयांच्या,’टास्क फोर्स’ची ही समन्वयक बैठक आम्ही यशस्वीपणे पार पाडू.ही बैठक ज्ञानाचे आदान-प्रदान,सर्वोत्तम कार्यपद्धतींचा प्रचार-प्रसार आणि डीबीटी स्टार कॉलेज प्रोग्राम ची उद्दिष्टे अधिक बळकट करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरेल”-संदीप रोहमारे,विश्वस्त,कोपरगाव एज्युकेशन सोसायटी,कोपरगाव.

      डीबीटी स्टार कॉलेज योजना ही भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे.या योजनेचा मुख्य उद्देश पदवी स्तरावरील विज्ञान शिक्षण मजबूत करणे,विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढवणे आणि त्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.महाविद्यालयांमधील विज्ञान प्रयोगशाळा आधुनिक करणे आणि नवीन उपकरणे खरेदी करणे.विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्षात प्रयोगशाळेत काम करण्याची आणि प्रगत तंत्रज्ञान शिकण्याची संधी देणे.पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना लहान संशोधन प्रकल्प राबवण्यासाठी प्रवृत्त करणे असा आहे त्यामुळे प्रयोगशील वृत्ती वाढून त्यांच्या गुणांना दिशा मिळण्यास मदत होत असते.डीबीटी स्टार कॉलेज हे केंद्र सरकारचे वरिष्ठ महाविद्यालयांसाठीचे स्वतंत्र मंत्रालय असून त्या अंतर्गत देशभरातील उच्च गुणवत्ता असलेल्या महाविद्यालयांना संशोधनासाठी भरीव अनुदान दिले जाते.त्यासंदर्भात दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर अशा बैठका आयोजित करण्यात येतात.यावर्षी या तीन दिवसीय बैठकीसाठी यजमान संस्था म्हणून कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाची निवड झाली आहे.ही समन्वयक बैठक हायब्रीड स्वरूपात आयोजित करण्यात येत असून यात सुमारे 350 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.ज्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे 20 टास्क फोर्स सदस्य व प्रतिनिधी आणि स्टार कॉलेज मधील 80 प्रतिनिधी आपापल्या संशोधन प्रकल्पांची प्रगती आणि निष्पत्ती दर्शविणारे पोस्टर्स प्रदर्शित करणार आहेत.तसेच तज्ज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शन देखील होणार आहे.त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी याप्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त संदीप रोहमारे व या आढावा बैठकीचे संयोजक डॉ.शंकरैया कोंडा उपस्थित होते.

   यापूर्वी सहाय्य प्राप्त प्रतिनिधींचा संशोधन प्रवास,यश,कार्यपद्धती,नाविन्यपूर्ण उपक्रम आणि एकूण प्रभाव यावर देखील प्रकाश टाकला जाईल.देशभरातून सुमारे 250 प्राध्यापक समन्वयक व इतर संबंधित घटकांचा सहभाग या समन्वयक बैठकीत असणार आहे.

   या प्रसंगी उपस्थित असलेले कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त संदीप रोहमारे म्हणाले की,”स्टार कॉलेज प्रोग्राम अंतर्गत सहाय्य प्राप्त महाविद्यालयांच्या,’टास्क फोर्स’ची ही समन्वयक बैठक आम्ही यशस्वीपणे पार पाडू.ही बैठक ज्ञानाचे आदान-प्रदान,सर्वोत्तम कार्यपद्धतींचा प्रचार-प्रसार आणि डीबीटी स्टार कॉलेज प्रोग्राम ची उद्दिष्टे अधिक बळकट करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरेल,असा ठाम विश्वास वाटत असल्याचे शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close