निधन वार्ता
शकुंतला घमंडी यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील यशवंत हौसिंग सोसायटी येथील रहिवासी,ब्राह्मण समाजाच्या ज्येष्ठ सदस्या शकुंतला पद्माकर घमंडी (वय-८४) यांचे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,मुलगी,असा परिवार आहे.

स्व.शकुंतला घमेंडी या अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाच्या म्हणून कोपरगाव शहर आणि परिसरात परिचित होत्या.त्यां दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरी म्हणून शहरात परिचित होत्या.त्या बजाज फायनान्सचे अधिकारी धनंजय घमंडी यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



