जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव नजीक कोकमठाण हद्दीत असलेल्या राष्‍ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या आर.जे.एस.कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे “रेणूपासून औषधापर्यंतचा शोध,रचना आणि निर्मिती” या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.हे चर्चासत्र दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रसाद कातकडे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.संतोष एस. छाजेड (एम.इ.टी.स इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नाशिक) व डॉ.सचिन एस.गायकवाड (एम.इ.टी.स इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नाशिक) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

   या चर्चासत्राचा उद्देश औषध निर्मिती क्षेत्रातील नव्या संशोधन प्रवाहांची माहिती देणे,तसेच विद्यार्थ्यांना,संशोधकांना व प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचित करणे हा आहे.विशेषतः औषधाच्या रासायनिक संरचनेत बदल करून त्याचा शरीरावरील जैविक परिणामांवर काय परिणाम होतो,याचा गणितीय किंवा सांख्यिकीय अभ्यास यावरून नवीन अधिक प्रभावी औषधे बनवण्याचा अंदाज घेतला जात असून यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे आदींच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम संपन्न होतआहे.

  या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.संतोष एस. छाजेड (एम.इ.टी.स इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नाशिक) व डॉ.सचिन एस.गायकवाड (एम.इ.टी.स इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नाशिक) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.ते अनुक्रमे “संगणक-सहाय्यित औषध रचना,औषध शोधण्यातील साधने आणि अनुप्रयोग आणि औषध निर्मिती धोरणे व सक्रिय रेणूंपासून प्रभावी औषधाचे स्वरूप” या विषयांवर सविस्तर व्याख्याने देणार आहेत.

   सदर चर्चा सत्रात नोंदणी,उद्घाटन,तज्ज्ञ व्याख्याने,प्रश्नोत्तर सत्र,तसेच प्रमाणपत्र वितरण अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.या कार्यक्रमात प्राध्यापक,संशोधक (पदव्युत्तर आणि विद्यावाचस्पती) तसेच बी.फॉर्म आणि एम.फॉर्म चे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.नोंदणी शुल्क २०० रुपये ठेवण्यात आले असून इच्छुकांनी २२ एप्रिल २०२६ पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.

    सदर नोंदणीसाठी क्यू.आर.कोडद्वारे किंवा ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करता येणार आहे.अधिक माहिती साठी +91 9604679000 ह्या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.औषधनिर्मिती क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळविण्याची संधी असून,इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ.नितीन पी.जैन हे असून सहसंयोजक डॉ.उषा जैन आणि समन्वयक कवडे डी.एम.आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close