शैक्षणिक
… या शहरात महात्मा फुले,शाहू,कर्मवीरांचे पुतळे उभारा-मागणी

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
आज रोजी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करते वेळी
त्याच जागेत शोषितांच्या शिक्षणासाठी कार्य करणारे महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराज यांचे पुतळे स्थापित करावे अशी मागणी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचेकडे जनरल बॉडी सदस्य संदीप वर्पे यांनी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याचे कोपरगाव तालुक्यात स्वागत होत आहे.

ज्योतिबा फुले हे एक दूरदर्शी समाजसुधारक होते ज्यांनी १९व्या शतकातील भारतातील जाती-आधारित भेदभावाला आव्हान देण्यासाठी आणि उपेक्षित समुदायांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम केले.शिक्षण,महिला हक्क आणि समानतेचा प्रचार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी भारतातील आधुनिक सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया घातला होता.

राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात.शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते.त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली.१८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.

तर कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते.सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या आजच्या घडीला आशिया खंडात सर्वाधिक शाखा आहेत.त्यांचे शैक्षणिक कार्य लक्षात घेऊन ऍड.संदीप वर्पे यांनी ही मागणी केली आहे.

सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह खा.सुप्रिया सुळे आदीसंह रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी,व्हाइस चेअरमन भगीरथ शिंदे अडीमण्यवर उपस्थित होते.दरम्यान या मागणीबाबत खा.शरद पवार यांनी पुढील कार्यवाही करण्यास संमती दिली असल्याची माहितीही संदीप वर्षे यांनी शेवटी दिली आहे.