शैक्षणिक
….या महाविद्यालयात नवउद्योजक शिबिर उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव- (प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या के.जे.सोमैया महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,विद्यार्थी विकास मंडळ व स्टार्टअप व इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने नवउद्योजक शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

“उद्योजक नवीन उत्पादने किंवा सेवा सादर करून,समस्या सोडवून आणि बाजारपेठेत नोकऱ्या निर्माण करून आर्थिक वाढ घडवून आणतात.म्हणून नवीन पिढीने नव उद्योगात उतरणे आवश्यक ठरते”-डॉ.विजय ठाणगे,प्राचार्य,के.जे.सोमय्या महाविद्यालय,कोपरगाव.
उद्योजकता ही नफा मिळविण्यासाठी नवीन व्यवसाय उपक्रम तयार करणे,विकसित करणे आणि व्यवस्थापित करण्याची प्रक्रिया आहे. यात नावीन्य,जोखीम घेणे आणि संधी ओळखण्याची आणि ती मिळवण्याची क्षमता यांचा समावेश आहे.उद्योजक नवीन उत्पादने किंवा सेवा सादर करून,समस्या सोडवून आणि बाजारपेठेत नोकऱ्या निर्माण करून आर्थिक वाढ घडवून आणतात.म्हणून नवीन पिढीने नव उद्योगात उतरणे आवश्यक ठरते.यासाठी के.जे.सोमय्या महविद्यालय येथे या शिबिराचे आयोजन नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
या शिबिरात कालांश उद्योग समूहाचे संचालक रोहित काले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे हे होते.
यावेळी रोहित काले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हा असा सल्ला दिला.कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातून उद्योजक होताना अनेक अडचणी आल्या,परंतु त्यावर मात करून आज राजगिरा पासून लाडू,चिक्की इत्यादी उत्पादनाला महाराष्ट्रभर बाजारपेठ निर्माण केली असल्याचा दावा केला आहे. उद्योजक होण्यासाठी भांडवलापेक्षा मानसिक तयारी आणि त्यासाठी योग्य नियोजन हे अधिक महत्त्वाचे असते.बाजारपेठेचा आणि ग्राहकाचा कल लक्षात घेऊन उत्तम गुणवत्तेचे प्रॉडक्ट उद्योजक तयार करू शकला तर त्याची स्पर्धा कोणीही करू शकत नाही.विद्यार्थ्यांनी उद्योजकता विकास व कौशल्य आत्मसात करून उद्योजक बनावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात “नोकरी शोधणारे होऊ नका तर नोकरी देणारे बना. त्यासाठी उद्योजकीय कौशल्य व ज्ञान आत्मसात करा आणि उद्योजक बना,” असे आवाहन केले आहे.
सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महारुद्र खोसे यांनी केले तर स्टार्ट अप व इनोव्हेशन सेलचे समन्वयक डॉ.शंकरय्या कोंडा यांनी उपस्थितांचे स्वागत केले आहे.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र जाधव यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन डॉ.नामदेव ढोकळे यांनी मानले आहे.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सदाशिव नागरे डॉ.सुरेश देवरे,डॉ.गणेश शिंदे,प्रा.औताडे,डॉ. नीता शिंदे,डॉ.अभिजित नाईकवाडे यांनी परिश्रम घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.