जयंती,पुण्यतिथी अभिवादन
माजी सैनिकाचे जयंतीनिमित्त वृक्षारोपण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यात माजी सैनिकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम चळवळ उभारणारे माजी सैनिक आर.बी.तथा आप्पा घोडके यांच्या १०६ व्या जयंती निमित्ताने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे आंबा व फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सन-१९६२ मध्ये पुण्याचे पानशेत धरण फुटले तेव्हा आप्पा कोपरगांव नगरपालिकेत आपत्कालीन विभागाचे प्रमुख होते.आप्पांना तातडीने पुण्यात बोलावणे धाडले.आप्पांचे घरी पत्नी सुमतीबाई आणि मुले लहान होती.परिस्थिती बेताचीच परंतू कर्तव्यनिष्ठ आप्पा क्षणाचा विलंब न करता पुण्यात दाखल झाले.पुण्यातील हे संकट पाहून त्यांच्यातील लष्करी शिपाई जागा झाला.आपत्कालीन परिस्थितीचे निवारण करणा-या महाराष्ट्रातील महत्वाच्या पथका सोबत एक महिना शेकडो जीव वाचवण्यासाठी ज्यांनी शर्थ केली.त्यांचा तत्कालीन कलेक्टर आणि महापौर यांनी गौरव केला होता.
माजी सैनिक संघटना व माजी सैनिक आर.बी.तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठाण,कोपरगांव वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी माजी सैनिक आर.बी.तथा आप्पा घोडके यांच्या थोरल्या कन्या रजनीताई नलगे,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे यांचे शुभहस्ते फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी सेवानिवृत्त सुभेदार मारुतीराव कोपरे,हवालदार विजय वाघ,प्रकाश घोडके,सुरेश घोडके,दिलीप घोडके,सुशांत घोडके,वसतिगृह अधिक्षक प्रशांत आहेर यांचेसह वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे,सेवानिवृत्त सुभेदार मारुतीराव कोपरे यांनी,लष्करातील उत्कृष्ट सेवेतील निवृत्ती नंतर कोपरगांव नगरपरिषदेचे पहिले आपत्ती व्यवस्थापन प्रमुख केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.तसेच त्यांच्या शिस्त,प्रामाणिक आणि राष्ट्राप्रती समर्पित सेवेच्या आठवणींना उजाळा दिला.प्रारंभी माजी सैनिक कै. आर. बी. तथा आप्पा घोडके यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत सुशांत घोडके यांनी तर आभार आर्यन घोडके यांनी केले. वसतिगृह विद्यार्थी यांना खाऊचे वाटप करण्यात आले आहे.



