जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कुलूप तोडून मोठी चोरी,अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले व मोर्विस शिवारात आपला,’हॉटेल सत्या’ परमिट रूम व बियरबार हे हॉटेल असलेले इसम संजय राजेंद्र जाधव (वय-३९) यांची मोठी चोरी झाली असून अज्ञात चोरट्याने शुक्रवार दि.०६ ऑक्टोबर च्या रात्री ११ वाजेनंतर विविध २९ कंपन्यांच्या ०३ लाख ११ हजार २९० रुपयांच्या ०२ हजार १६४ विविध दारूच्या बाटल्यांची चोरी केली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे व्यावसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोर्विस येथे शिर्डी-लासलगाव येथील मार्गावर,’हॉटेल सत्या’ नावाचे हॉटेल असून त्या ठिकाणी त्यांचे बियर बार व परमिट रूम आहे.ते हॉटेल नेहमी रात्री १० नंतर बंद करुन दि.०६ ऑक्टोबर रोजी ते आपल्या घरी गेले असता त्या हॉटेल मध्ये अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटरचे कुलूप तोडून त्याचा कोयंडा वाकवून २९ कंपन्यांच्या ०३ लाख ११ हजार २९० रुपयांच्या ०२ हजार १६४ विविध दारूच्या बाटल्यांची चोरी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण बेसुमार वाढले आहे.त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला का असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.त्यामुळे या चोऱ्या वरचेवर वाढत चालल्या आहेत.याला आळा घालणे गरजेचे असताना त्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही.सर्वच आघाड्यावर सामसुम दिसत आहे.तालुक्यातील झगडे फाटा येथे नागरिकांनी दोन संशयित दुचाकी चोरांना पकडले असल्याची समाधान कारक बातमी असली तरीं त्यातून किती दुचाकी परत मिळवल्या व अन्य किती गुन्हे उघड झाले आहे हा संशोधनाचा विषय आहे.कोपरगाव तालुक्यात चोऱ्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही.अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच उघड झाली असून ती मोर्विस शिवारातील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सदर घटनेत फिर्यादीने म्हटले आहे की,”फिर्यादी हा सुरेगाव हद्दीत रहिवासी असून त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे.त्यांचे मोर्विस येथे शिर्डी-लासलगाव येथील मार्गावर,’हॉटेल सत्या’ नावाचे हॉटेल आहे.त्या ठिकाणी त्यांचे बियर बार व परमिट रूम आहे.ते आपले हॉटेल नेहमी प्रमाणे साधारण रात्री १० नंतर बंद करतात.व आपल्या घरी निघून जातात.दि.०६ ऑक्टोबर रोजी रात्री आपले हॉटेल बंद करून ते आपल्या घरी गेले असता त्या हॉटेल मध्ये अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटरचे कुलूप तोडून त्याचा कोयंडा वाकवून त्यात प्रवेश करून त्यातील विविध कंपन्यांच्या ०२ हजार १६४ विदेशी दारूच्या बाटल्या,सी.सी.टी.व्ही.कॅमेरे आदी सुमारे ०३ लाख ११ हजार २९० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस हे.कॉ.संदीप बोटे  यांनी भेट दिली आहे.
              
दरम्यान या आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४८०/२०२३ भा.द.वि.कलम ४५७,३८०,४२७  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.बोटे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close