जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

तलाठ्यास घेऊन फरार होणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीतील अवैध वाळूचोरीस प्रातिबंध करण्यास गेलेल्या धामोरी येथील तलाठी शिवनाथ थोरात या तलाठ्यास व गाडीत बसून ती गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तलाठयास गाडीत असतानाच वेगाने गाडी पळवून नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर सोडून देऊन पोबारा करणारा पिकअप चालक आरोपी सुखदेव बबन कंक्राळे यास कोपरगाव तालुका पोलिसानी शनिवार दि.७ मार्च रोजी रात्री ९.३९ वाजता सिन्नर येथील भर भाजीपाला बाजारातून अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला रविवारी कोपरगाव येथील सुटीच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काल सकाळी कोपरगाव तालुका पोलिसांना या आरोपी संदर्भात गुप्त बातमी मिळाली होती व आरोपी हा आता भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो असे समजले होते व तो आज सिन्नर येथील भाजीपाला बाजारात भाजीपाला विक्रीसाठी गेला असल्याची माहिती प्राप्त झाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री शिंदे व चंद्रकांत तोर्वेकर यांनी सदर ठिकाणी गेले असता त्या बातमीत तथ्य आढळले व त्यांनी त्यावर झडप घालून त्यास अटक केली आहे.

सदर चे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीत वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध केलेला असतानाही तेथे पांडू लकारे यांच्या शेतातून साठवलेली वाळू अवैध रित्या घेऊन एक पिकअप जात असल्याची खबर कोपरगाव येथील वाळू उपसा प्रतिबंधक पथकास मिळाली होती.त्यानुसार धामोरी येथील तलाठी शिवनाथ थोरात यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी धाव घेऊन सदरची महिंद्रा पिकअप गाडी अडविण्याचा प्रयत्न केला व गाडीवर चढून ती गाडी कोपरगाव तालुका तहसीलदार कार्यालयात घेण्यास सांगूनही आरोपी सुखदेव कंक्राळे याने हि गाडी उलट लासलगावच्या दिशेने भरधाव नेऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला होता.व पुढे नेऊन सदर गाडी निर्जन स्थळी नेऊन नगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषेवर सातमोऱ्या येथे नेऊन त्यांना निर्जनस्थळी सोडून देऊन हा आरोपी गाडीचालक फरार झाला होता तो पासून पोलीस त्याच्या शोधात होते.दरम्यान पोलिसानी या प्रकरणी आरोपी सुखदेव कंक्राळे व पांडू लकारे यांचे विरुद्ध तालुका पोलिसात गु.र.नं.१६१/२०१९ भा.द.वि.कलंम ३५३,३७९,३६५,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.तो पासून पांडू लकारे या आरोपीने अटकपूर्व जमीन मिळवला होता मात्र चालक सुखदेव कंक्राळे हा मात्र फरार झाला होता.तो पासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

काल सकाळी कोपरगाव तालुका पोलिसांना या आरोपी संदर्भात गुप्त बातमी मिळाली होती व आरोपी हा आता भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो असे समजले होते व तो आज सिन्नर येथील भाजीपाला बाजारात भाजीपाला विक्रीसाठी गेला असल्याची माहिती प्राप्त झाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री शिंदे व चंद्रकांत तोर्वेकर यांनी सदर ठिकाणी गेले असता त्या बातमीत तथ्य आढळले व त्यांनी त्यावर झडप घालून त्यास अटक करून रविवारी दुपारी कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीने पळवून नेलेली पिकअप जप्त करावयाची असल्याने आरोपी सुखदेव कंक्राळे यास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.फरार आरोपीस पोलिसानी अटक केल्याने वाळूचोरांत खळबळ उडाली आहे.व तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close