कोपरगाव तालुका
कोकमठाण शिवारात विहिरीत पडून एक ठार

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत शेती महामंडळाचे पडीत असलेल्या शेतजमिनीत असलेल्या विहिरीत पडून येवला रोड, कोपरगाव येथील इसम शामकांत रघुनाथ मोरे (वय-४६) हा ठार झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आधी हरविल्याच्या नोंदणी पुस्तिकेत नोंद करण्यात आली होती मात्र नंतर गायब इसमाचा शोध लागला असून त्यांचा मृतदेह हा कोकमठाण शिवारातील विहिरीत आढळून आल्याने पोलिसानी त्यांची नोंद अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तिकेत केली आहे.या प्रकरणी संवत्सर बारहाते वस्ती येथील व्यंकटेश प्रतापराव बारहाते (वय-३५) यांनी खबर दिली आहे.त्या नुसार पोलिसानी आपल्या दप्तरी नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.व्ही. गवसने हे करीत आहेत.