जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पांडुरंग परजणे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(वार्ताहर)

संवत्सर येथील नऊचारी परिसरातील प्रगतशील शेतकरी पांडुरंग महादू परजणे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले आहे.मृत्यू समयी त्यांचे वय ८८ वर्षे होते.त्यांच्यावर संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.पांडुरंग परजणे हे नामदेवराव परजणे पाटील सेवा सहकारी संस्थेचे संचालक बबनराव परजणे यांचे वडील तर महाराष्ट्र शासनाच्या रोजगार निर्मिती जाहिरातीमधील कलाकार स्वप्नील परजणे यांचे आजोबा होते.पांडुरंग परजणे हे भाऊ या नांवाने पंचक्रोशीत परिचित होते.त्यांच्या निधनाबद्दल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील,संवत्सर ग्रामपंचायतीचे उप सरपंच विवेक परजणे,सरपंच सुलोचना ढेपले यांनी शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close