जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

येवला नाक्यावर तुंबळ हाणामारी,दहा जणावर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण दिड कि.मी.अंतरावर असलेल्या येवला नाका या ठिकाणी फिर्यादी नितीन दगडू त्रिभुवन (वय-४१) याने आरोपी चेतन शिरसाठ याचे त्याच्या मावस भावाबरोबरचे भांडणे मिटवल्याचा राग मनात धरून फिर्यादिस आरोपी व त्याच्या दहा साथीदारांनी लाकडी दांडके व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

कोपरगाव येथील फिर्यादी नितीन त्रिभुवन याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यात त्याने म्हटले आहे कि,आरोपी चेतन शिरसाठ व त्याचे मावस भावाबरोबर भांडण झाले होते व ते भांडण आपण त्या वेळी मिटवले याचा आरोपी शिरसाठ यास राग होता.हा राग मनात धरून आरोपी चेतन शिरसाठ याने त्याचे साथीदार आरोपी विशाल पिंगळे रा.साई कॉर्नर,वैभव शिंगाडे.रा.ब्राह्मणगाव, आदित्य गरुड रा.विद्यानगरी, गणेश लोखंडे,कोल्हेवस्ती,सचिन आहेर एच.पी.गॅस गोडावून जवळ,शैलेश शेलार आढाव वस्ती,येवला नाका, राहुल गायकवाड संजयनगर, भावड्या शिंदे,रा.ब्राह्मणगाव,दत्तू साबळे रा.टाकळी नाका ,कोपरगाव आदी दहा जणांनी फिर्यादी नितीन त्रिभुवन यास शुक्रवार दि.६ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास येवला नाका येथे अडवून त्यास मागील भांडण मिटवल्याचा राग मनात धरून त्यास लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आहे.या प्रकरणी फिर्यादिस गंभीर दुखापत झाल्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती या करण्यात आले होते.त्या नंतर त्याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गु.र.नं.९६/२०२० भा.द.वि.कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३),१३५ प्रमाणे दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close