निधन वार्ता
सीताबाई भारूड यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संपतराव भारूड यांच्या मातोश्री श्रीमती सीताबाई जमनराव भारूड (वय-८९) यांचे नुकतेच वृद्धपकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात सहा मुले,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.
स्व.श्रीमती सीताबाई भारूड या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर संवत्सर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.