जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

किरकोळ कारणावरून हाणामारी,०४ जणांवर गुन्हा दाखल !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत रहिवासी असलेल्या राहुल लोहकणे (वय-२० वर्षे) यास मागील भांडणाचे निमित्त उकरून काढून किरकोळ कारणावरून आरोपी अभिजित आरणे,सिद्धार्थ बलसाने,दादू बलसाने,सचिन पवार आदींनी मारहाण केल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे कोकमठाण परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

यातील फिर्यादी आणि आरोपी यांचे आधी किरकोळ कारणावरून वाद झाले होते.ते मिटवण्यासाठी अभिजित आरणे,सिद्धार्थ बलसाने,दादू बलसाने,सचिन पवारसह काही जण दि.१८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता घटनास्थळी मिटवामिटवी करण्यासाठी गेले होते.घटनेच्या दिवशी सदर फिर्यादी आणि आरोपी हे गावातील नंदुराज किराणा दुकानासमोर उभे असताना ही गंभीर घटना उघडकीस आली आहे.

  कोपरगाव शहर परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पोलिस अधिकाऱ्यांचा गुन्हेगारांवर धाक राहिला असल्याचे दिसत नाही.परिणामी किरकोळ किरकोळ घटना गंभीर गुन्ह्याचे स्वरूप घेताना दिसून येत आहे.कोपरगाव शहरातील एका ठोक विक्रेत्याच्या दुकानाचे उद्घाटन करण्यास पालक मंत्री आले असताना त्यांना न जुमानता चोरट्यांनी एका कार्यकर्त्याच्या खिशावर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते.परिणामी यात पोलिसांची नाचक्की झाली असल्याचे बोलले जात असून याची गंभीर दखल पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतली आहे.त्यामुळे तातडीने कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी तातडीची बैठक शहर पोलिस ठाण्यात घेतली होती.त्यावेळी त्यांनी पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.अशीच एक घटना शहर पोलीस ठाण्याचे हद्दीत उघडकीस आली असून यातील फिर्यादी राहुल लोहकणे आणि त्यांचे सहकारी यांच्यात किरकोळ कारणावरून आधी वादावादी आणि नंतर हाणामारी झाली असल्याची बाब उघड झाली आहे.

संकल्पित छायाचित्र.

  दरम्यान अजून एक घटना उघडकीस आली असून यातील मोहिनीराजनगर येथील महिला शीतल विक्रम पवार (वय -42) या दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 01 वाजता आपल्या बँक खात्यावरील 50 हजारांचा रोख रक्कम काढून घरी जात असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ दोन अनोळखी इसमांनी आपल्या दुचाकीवर येऊन त्यातील मागे बसलेल्या भामट्याने त्यांच्या हातात पैसे ठेवलेली बॅग घेऊन पोबारा केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



  यातील फिर्यादी आणि आरोपी यांचे आधी किरकोळ कारणावरून वाद झाले होते.ते मिटवण्यासाठी अभिजित आरणे,सिद्धार्थ बलसाने,दादू बलसाने,सचिन पवारसह काही जण दि.१८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता घटनास्थळी मिटवामिटवी करण्यासाठी गेले होते.घटनेच्या दिवशी सदर फिर्यादी आणि आरोपी हे गावातील नंदुराज किराणा दुकानासमोर उभे असताना आधी बाचाबाची आणि नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले असल्याची माहिती पोलिस अधिकारी उद्धव डमाळे यांनी दिली आहे.

  दरम्यान याबाबत फिर्यादी राहुल लोहकणे यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close