शैक्षणिक
..या महाविद्यालयातर्फे ‘स्कूल कनेक्ट 3.0’ संपर्क अभियान

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध संधींची माहिती देण्यासाठी ‘स्कूल कनेक्ट 3.0’ संपर्क अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले आहे.या अभियानांतर्गत कोपरगावशहर व परिसरातील १२ कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ आणि उच्च शिक्षणातील बदलांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शैक्षणिक संरचना,अभ्यासक्रमाची रचना,क्रेडिट पद्धती,विविध विद्याशाखांतील विषयांचे महत्त्व आणि करिअरच्या उपलब्ध संधी,ए.बी.सी.आयडी,अपार आयडी,डिजिलॉकर आणि नवीन परीक्षा पद्धती यांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे.
‘स्कूल कनेक्ट’ अभियान हा प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे राज्यातील अकृषिक विद्यापीठांच्या सहकार्याने राबवला जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम असून या अभियानाचा मुख्य उद्देश इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना उच्च शिक्षणाच्या विविध संधी,राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि शासकीय योजनांबद्दल जागरूक करणे हा आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात झालेले लवचिक बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप-एम्बेडेड डिग्री प्रोग्राम,इंटर्नशिप आणि भारतीय ज्ञान प्रणाली यांसारख्या आधुनिक शैक्षणिक घटकांची माहिती देण्याचे काम करण्यात येते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आदेशान्वये या अभियानाचे कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे समन्वयक डॉ.अर्जुन भागवत,कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.बंडेराव तऱ्हाळ,विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ.निलेश मालपुरे तसेच कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शैक्षणिक संरचना,अभ्यासक्रमाची रचना,क्रेडिट पद्धती,विविध विद्याशाखांतील विषयांचे महत्त्व आणि करिअरच्या उपलब्ध संधी,ए.बी.सी.आयडी,अपार आयडी,डिजिलॉकर आणि नवीन परीक्षा पद्धती यांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे.यावेळी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षण,कौशल्यविकास आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.तर प्रास्ताविक डॉ.अर्जुन भागवत यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार डॉ. निलेश मालपुरे मानले आहे.



