जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

रामभाऊ गायकवाड यांचे निधन

न्यूजसेवा


संवत्सर (प्रतिनिधी)

   नाशिक येथील प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी कार्यालयातील सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी गोपीनाथ रामभाऊ गायकवाड यांचे पिताश्री रामभाऊ वामनराव गायकवाड (वय-96)यांचे सोमवार दि.१३ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान निधन झाले आहे.नाशिक येथील पंचवटी अमरधामध्ये गोदावरी काठावर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.या प्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

स्व.रामभाऊ गायकवाड याचे छायाचित्र.

स्व.रामभाऊ गायकवाड हे रामवाडी (संवत्सर) येथे अनेक वर्षे वास्तव्यास होते.कै.दशरथ आचारी यांच्याकडे शिवणकाम करीत होते.त्यावेळी नेहरु शर्ट शिवण्यात ते तरबेज मानले जात होते.अनेक पुढारी मंडळी त्यांच्याकडून नेहरु शर्ट शिवून घेत असत.त्यांचे चिरंजीव गोपीनाथ गायकवाड यांचे बालपण रामवाडी परिसरात गेले.शिक्षणही रामवाडी व जनता इंग्लिश स्कूल येथेच झाले होते.त्यानंतर पुढील शिक्षण नाशिक येथे झाले होते.

      कै.रामभाऊ हे अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाचे म्हणून परिचित होते.स्व.रामभाऊ गायकवाड हे रामवाडी (संवत्सर) येथे अनेक वर्षे वास्तव्यास होते.कै.दशरथ आचारी यांच्याकडे शिवणकाम करीत होते.त्यावेळी नेहरु शर्ट शिवण्यात ते तरबेज मानले जात होते.अनेक पुढारी मंडळी त्यांच्याकडून नेहरु शर्ट शिवून घेत असत.त्यांचे चिरंजीव गोपीनाथ गायकवाड यांचे बालपण रामवाडी परिसरात गेले.शिक्षणही रामवाडी व जनता इंग्लिश स्कूल येथेच झाले होते.त्यानंतर पुढील शिक्षण नाशिक येथे झाले त्यानंतर ते नाशिक येथील प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले  होते.त्यांचे वडील रामभाऊ गायकवाड हे नाशिक येथेच त्यांच्याकडे वास्तव्यास होते.वयाच्या ९६ वर्षी अखेर रामभाऊ यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा गोपीनाथ,सुन,तीन नातवंडे असा मोठा परिवार आहे.

   कै.रामभाऊ गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोपरगांव येथील गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे तसेच नंदकिशोर कोदे,संवत्सर येथील अनिल आचारी,पत्रकार शिवाजी गायकवाड,बापुसाहेब परजणे,माजी केंद्रप्रमुख दिलीप ढेपले आदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close