निधन वार्ता
खंडू भोकरे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील रहिवासी सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते ह.भ.प.खंडू त्र्यंबकराव भोकरे यांचे आज दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले आहे.मृत्यू समयी ते ८० वर्षाचे होते.त्यांच्यावर दुपारी संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित होते.

स्व.नामदेवराव परजणे यांचे विश्वासू सहकारी कै.खंडू भोकरे यांचा सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यात मोलाचा सहभाग होता.सहजानंदनगर येथील नामदेवराव परजणे पा.सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे त्यांनी कार्यभार सांभाळला होता.
स्व.नामदेवराव परजणे यांचे विश्वासू सहकारी कै.खंडू भोकरे यांचा सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यात मोलाचा सहभाग होता.सहजानंदनगर येथील नामदेवराव परजणे पा.सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे त्यांनी कार्यभार सांभाळला होता.त्यामुळे दुग्ध व्यवसायाचा त्यांना चांगला अनुभव होता.या व्यवसायाच्या संदर्भात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन या व्यवसायाकडे त्यांना वळविले होते.मनमिळावू स्वभावामुळे पंचक्रोशीत व तालुक्यात ते सर्वांच्या परिचित होते.त्यांच्या पश्चात दिलीप भोकरे व रामभाऊ भोकरे ही दोन मुले,मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे यांनी कै.खंडू भोकरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.त्यांच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थ,नातेवाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



