जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

विठ्ठलराव परजणे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर (वार्ताहर)

कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी वि‌ठ्ठलराव रंगनाथ परजणे यांचे रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ७६ वर्षाचे होते.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

    

  कै.विठ्ठलराव परजणे हे दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांचे चुलत पुतणे तर पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचे चुलत बंधू होते.प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा लौकीक होता.मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान मिळविले होते.त्यांच्यामागे चिरंजीव संतोष व आबासाहेब ही दोन मुले,दोन मुली,पत्नी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी महानुभाव पंथीय महंतांनी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण करून कै.विठ्ठलराव परजणे यांना आदरांजली वाहिली.यावेळी संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी अनेकांनी कै.विठ्ठलराव परजणे यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close