जाहिरात-9423439946
मनोरंजन

डोळ्यापुढे अंधारी येते, थकवा जाणवतो का? हे असू शकतं ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण

जाहिरात-9423439946

मुंबई : अनेक वेळा आपण आपल्या शरीरात होणारे बदल किंवा त्रास गांभीर्याने घेत नाही. अगदीच अंथरुणावर पडायची वेळ आली की मग शरीराकडे लक्ष देतो आणि तोपर्यंत आजारान गंभीर रूप घेतलेलं असतं. खरं तर प्रत्येक मोठ्या आजाराची लक्षणं शरीरात दिसत असतात. शरीर आतल्या बदलाचे संकेत देत असतं, पण रोजच्या धावपळीत आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. स्त्रिया तर हमखास अशा संकेतांकडे लक्ष देतात. शरीर, आरोग्य ही आपली प्रायॉरिटी असायला हवी, पण नेमकं आपण त्याकडेच दुर्लक्ष करतो. लो ब्लड प्रेशर हा असाच हळूहळू मोठा होणारा आजार आहे. याकडे योग्य वेळी लक्ष दिलं तर परिणाम गंभीर होत नाहीत आणि आजार आटोक्यात राहतो.

ey blind साठी इमेज परिणाम

डोळ्यापुढे मधूनच अंधारी येणं, थकवा जाणवणं, दम लागणं, शरीर थंड पडणं अशी लक्षणं दिसत असतील तर तातडीनं वैद्यकीय तज्ज्ञ गाठा. हाय-लो बीपीची लक्षणं असू शकतात. रक्तदाब कमी झाला तर चक्कर येते आणि वेळीच उपचार मिळाले नाहीत तर मेंदूला होणारा रक्त पुरवठा कमी पडून गंभीर आजार होऊ शकतो. हाताबाहेर केस गेली तर यात माणूस दगावू शकतो. त्यामुळे या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये.

तुम्ही खूप जास्त टेन्शन घेत असाल तर लो बीपीचा आजार वाढतो. चक्कर येणं, शरीर थंड पडणं आणि अंधारी येणं ही या आजाराची लक्षणं आहेत. लो ब्लड प्रेशरचा त्रास जाणवायला लागला की, शरीरातलं क्षारांचं प्रमाण कमी झालेलं असतं. अशा वेळी लिंबू, मीठ, साखर (डायबेटिस नसेल तर)पाणी तातडीने पिणं चांगलं. शरीरातली मिठाची मात्रा कमी पडली की, प्रेशर आणखी कमी होतं. त्यामुळे मीठ किंवा क्षारयुक्त पेय पिणं चांगलं. त्यामुळे चक्कर येत नाही.

लो बीपीचा अटॅक आला तर भरपूर पाणी पिणं हा लगेच करण्यासारखा उपाय आहे. पाण्यातून उपयुक्त क्षार पोटात जातात. हाय ब्लड प्रेशरसाठी मीठ वाईट किंवा घातकच. त्यामुळे चक्कर येतेय ती ब्लड प्रेशर वाढल्यामुळे की कमी झाल्यामुळे हे आधी तपासणं आवश्यक आहे.

ey blind साठी इमेज परिणाम

(टीप – या लेखातला सल्ला किंवा उपाय करून पाहण्यापूर्वी डॉक्टर किंवा वैद्यकीय तज्ज्ञांना विचारावं. लेखातले उपाय हे सर्वसामान्य माहितीवर आधारित आहेत. janshaktinews.in याची पुष्टी करत नाही. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close