जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा फाफट पसारा सुरूच

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.राज्यात सलग आठव्या दिवशी देशात हजारोहून जास्त कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही कोपरंगाव तालुक्यात नगरहुन तपासून आलेल्या अहवालात ०० तर खाजगी प्रयोग शाळेतून तपासणी केलेल्या अहवालात २७ तर रॅपिड टेस्ट मधून ०७ असे एकूण ३४ रुग्ण बाधित आढळल्याने कोरोनाचा कालचा विक्रम पुन्हा मोडीत निघाला असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.जात असून २८ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले असल्याने कोपरगाव शहर पुन्हा एकदा टाळेबंदीकडे वाटचाल तर करीत नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.त्या बाबत आज आ.आशुतोष काळे यांनी तातडीची बैठक घेतली आहे.

कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार २४१ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या १३९ असून आज पर्यंत ४८ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.४८ टक्के आहे.तर एकूण २१ हजार ९०८ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८७ हजार ६३२ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १४.७९ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ०५४ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ९४.२३ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख ६६ हजार ३७४ वर पोहोचली आहे.आतापर्यंत एकूण २१ लाख ०६ हजार ४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर राज्यात एकूण ०१लाख ०६ हजार ७० सक्रिय रुग्ण आहेत.नगर जिल्ह्यात बाधित रुग्ण ७८ हजार ५०३ आहे.तर सक्रिय ०२ हजार ०५८ आहे तर ७५ हजार ०८२ कोरोना मुक्त झाले आहे.तर आज पर्यंत ०१ हजार १६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण १३ बाधित रुग्णांत श्रद्धानगरी पुरुष वय-६०,लोणकर वस्ती महिला वय-४६,कांचन कंपाऊंड कोपरगाव येथील महिला वय-६५,एक बालक वय-०६,कृष्णाई मंगल कार्यालयासमोर एक पुरुष वय-४५,रेल्वे स्थानक पुरुष वय-३८,बागुल वस्ती एक पुरुष वय-५२,कोपरगाव पुरुष वय-३०,७०,कासलीवाल कंपाऊंड एक महिला वय-६२,गरवारे नगर पुरुष वय-३०,सुभाद्रनगर महिला वय-४१,म्हसोबा मंदिराजवळ कोपरगाव पुरुष वय-६२ आदींचा समावेश आहे.

तर तालुक्यात आज आलेल्या आकडेवारीत बाधित २१ रुग्णांत शिंगणापूर दोन पुरुष वय-३८,३७,एक महिला वय-६५,कोकमठाण दोन महिला वय-६२,३२,जी.प.शाळेजवळ कोकमठाण एक पुरुष वय-२६,तीनचारी कोपरगाव पुरुष वय-४०,टाकळी ०१ महिला वय-५५,न्हाई गल्ली टाकळी पुरुष वय-६१,तर शहाजापूर पुरुष वय-२३.पोहेगाव बु.,महिला वय-१६,कोळपेवाडी मोतीनगर पुरुष वय-३१,एक महिला वय-३४,करंजी मारुती मंदिराजवळ पुरुष वय-४६,वारी महिला वय-३४,कारवाडी दोन महिला वय-०४,२७,धोत्रे पुरुष वय-५५,माहेगाव पुरुष वय-४५,शिंदे वस्ती तीळवणी महिला वय-४०, आदींचा समावेश आहे.

दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close