जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील…या उपसरपंच पदाची निवड संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बक्तरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत काळे गटाच्या राधाबाई धर्मराज नागरे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीचेव सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या बत्तरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत राधाबाई नागरे यांना व विरोधी गटाच्या सरला सानप यांना समसमान ३ मते पडली होती.त्यावेळी दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून निवड करण्यात आली.यामध्ये काळे गटाच्या राधाबाई नागरे यांच्या नावाची चिट्ठी निघाल्यामुळे त्यांना उपसरपंचपदाचे बक्षीस मिळाले आहे.

बक्तरपूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच शिवाजी सानप यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर घेण्यात आलेल्या निवडणुकीत काळे गटाकडून राधाबाई नागरे यांनी उपसरपंच पदासाठी आपला अर्ज दाखल केला होता.तर विरोधी गटाकडून सरला सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

या पार पडलेल्या निवडणुकीत राधाबाई नागरे यांना व विरोधी गटाच्या सरला सानप यांना समसमान ३ मते पडली होती.त्यावेळी दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून निवड करण्यात आली.यामध्ये काळे गटाच्या राधाबाई नागरे यांच्या नावाची चिट्ठी निघाल्यामुळे त्यांना उपसरपंचपदाचे बक्षीस मिळाले आहे.
त्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामविकास अधिकारी एफ.एम.तडवी यांनी राधाबाई नागरे यांची उपसरपंच म्हणून निवड जाहीर केली आहे.
यावेळी उपसरपंच राधाबाई धर्मराज नागरे,सदस्य गणेश सानप,विशाल सानप,ताईबाई पवार,अशोक सानप,सोमनाथ सानप आदी उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच राधाबाई नागरे यांचे मा.आ.अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे आदीनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close