निधन वार्ता
नरहरी कुलकर्णी यांचे निधन
न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील नरहरी पांडुरंग कुलकर्णी (वय-९९) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्याच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
स्व.नरहरी कुलकर्णी हे अत्यन्त मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून प्रसिद्धी होते.ते पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्यात मॅन्युफॅक्चरिंग विभागात कार्यरत होते.नोकरी करुन त्यानी त्याचा व्यवसाय केला.परिसरात ते नरहरी गुरू या नावाने प्रसिद्ध होते.