जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगाव तालुक्यातील…या मंदिरात धार्मिक कार्यक्रमाची सांगता

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील नुकत्याच बांधण्यात आलेल्या श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा उत्सव उज्जैन येथील संदिपणी आश्रमाचे येथील पौराहित्य प.पु.आचार्य नीरज उपाध्याय यांच्या हस्ते मोठया उत्साहात आयोजन करण्यात आले होते त्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला असल्याची माहिती सागर केकाण यांनी दिली आहे.

या मंदिरात महाशिवरात्री पासून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सांगता आज करण्यात आली आहे.या निमित्ताने मंदिरापासून श्री नर्मदेश्वर मुखवट्याची पालखीतून संवाद्य,फटाक्याची अतिशबाजी,डमरूच्या दणाणात मिरवणूक काढण्यात आली होती.पालखीची सुरवात आ.आशुतोष काळे याच्या हस्ते पालखी पूजनाने करण्यात आली.

या मिरवणुकीत शंकर पार्वतीची वेशभूषा आकर्षण ठरले.या पालखी मिरवणुकीत प.पु.राघवेश्वरनंदगिरी महाराज,रमेशगिरी महाराज,आदिसह पंचकृशीतील अबाल वृद्ध,तरुण तरुणी भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close