जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरातील तरूणांचा शिवसेनेत प्रवेश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात नगरपरिषद निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह सर्वच आपला पक्ष वाढविण्याच्या प्रयत्नात असून शिवसेनेत अनेक तरुणांनी प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोपरगाव शहरात शिवसेना विविध सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रम राबवीत असुन नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम सुरू आहे.त्याला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.रक्तदान,सर्व रोग निदान शिबीर,नूतन शाखा प्रारंभ असे उपक्रम सुरू आहेत.कोरोना काळात अनेक नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.

सदर प्रसंगी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,शहर प्रमुख कलविंदर डडियाल,एस.टी.कामगार सेनेचे शहराध्यक्ष भरत मोरे,अस्लम शेख विधानसभा संघटक,इरफान शेख जिल्हा प्रमुख वाहतूक सेना,विकास शर्मा शहर उप प्रमुख ,बाळासाहेब सांळुके शहर संघटक,वैभव गिते शहर संघ संघटक,विशाल झावरे,विक्रांत झावरे,ऋषीकेष पवार,अमित भास्कर,वैभव हलवाई,ग्राहक संरक्षण मंचाचे राहुल देशंपाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी शिवसेना एस.टी कामगार सेनेचे शहराध्यक्ष भरत मोरे म्हणाले की,”शिवसेनेत अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार जातींचा समावेश आहे.शिवसेना पक्ष सर्वाना बरोबर घेवुन जातो.जातीपातीला काहीही महत्व देत नाही.

विधानसभा संघटक अस्लम शेख पुढे म्हणाले की,तुम्ही मुस्लिम समाजाचे आहात.तुम्ही भगवा घेतला असुन या भगव्याला तडा जावून देवु नका.अल्पसंख्यांक समाजाने भगवा अंगावर घेतला आहे.त्याला मानसन्मान दिलाच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेत मुस्लिम मावळे होते ते एकनिष्ठ होते.त्यांची प्रेरणा घेवुन पक्षा बरोबर एकनिष्ठ राहा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

शहरप्रमुख कलविंदरसिंग डडियाल म्हणाले की,पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे त्याच बरोबर शिवसेनेतील सर्वच पदाधिकारी यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत आपण प्रवेश केला.आपले सर्वाचे स्वागत असुन.शिवसेना हि ८० % समाजकारण आणि फक्त २० % गरज पडल्यास राजकारण करते.त्यामुळे शिवसेनेत असंख्य तरुण प्रवेश करत आहे.शिवसेनेच्या सामाजिक कार्यामुळे प्रामुख्याने तरुणांचे आकर्षण वाढत असुन शिवसेना हा युवकांचा पक्ष बनत आहे.शिवसेना आणखी प्रबळ करण्यासाठी प्रत्येक वार्डात शाखा आणि घरात शिवसैनिक निर्माण करणार आहोत.जफर पठाण,राजु सय्यद,आसिफ पठाण,नईम पठाण,रवि शेजवळ,आक्रम शेख,समिर शेख,रिजवान शेख,रेहान शेख आदि तरूणांनी शिवसेनेत नवरात्रिच्या शुभ प्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close