कोपरगाव तालुका
कोपरगावात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी फलकाचे”
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात नुकतेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात बुधवार दि. १३आॕक्टोबर रोजी “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी फलकाचे” अनावरण कोपरगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते मसुटा या चित्रपटाचे निर्माता लेखक आणि आगामी मास्क या चित्रपटाचे निर्माता भरत मोरे यांच्या हस्ते व माझा ज्ञानोबा या प्रसिद्ध टी.व्ही.मालिकेचे सहाय्यक लेखक सुदर्शन खडांगळे,कलाकार रमेश टीक्कल,लघु चित्रपट निर्माता रोहीत काले,यांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुर्यतेज संस्थचे संस्थापक अध्यक्ष,स्वच्छता दुत सुशांत घोडके हे होते.
या कार्यक्रमाला दीलीप तुपसैंदर, ए.जे कोताडे,डी.व्हि.विरकर,चौधरी आर.जे,गवळे वाय.के,सौ.बोरावके आर.आर,रायते यु.एस,महानुभाव के.एम,आदी शिक्षक,शिक्षिका सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित होते.
या प्रसंगी चित्रपट निर्माते भरत मोरे म्हणाले की दुरदर्शन वरील मालीका आणि चित्रपट हे प्रबोधन आणि मनोरंजनाचे माध्यम आहे.या तील कलाकारांचा सन्मान करुन श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाने घडवलेले विद्यार्थी आणि कलाकारांना दिलेली कौतुकाची थाप प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष
सुशांत घोडके यांनी स्वातंत्र्य समजून घेत ते टिकण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे.विचारांना कृतीची जोड देवून मातृभुमीची सेवा करण्याचा अमृत महोत्सवी वर्षात संकल्प करु या.असे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी सांगितले
गुरुजनांनी केलेला सन्मान हा आशिर्वाद असून श्रीमान गोकुळचंदजी
विद्यालयातील सर्व शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे.दुरदर्शन मालीकेच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील कोपरगावचे पाऊल भविष्यात नवोदित कलाकारांना संधीचे माध्यम ठरेल.असे कलाकार सुदर्शन खंडागळे स्पष्ट केले.
कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
श्रीमान गोकुळचंद विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यालयाचे कला शिक्षक अनिल अमृतकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी आभार मानले.