जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ चोरीतील आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथील रहिवासी असलेल्या महिलेच्या घराचे कडी कोयंडे तोडून आत प्रवेश करून घरातील महिलेस मारहाण करून जवळपास 06 लाख 65 हजार 300 रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यात शहर पोलिसांना यश आले असून यात त्याच भागातील रहिवासी चोरटा समीर उमर कुरेशी (वय-25) यासह हरेगाव येथील आरोपी संतोष काळे,सोन्या (पूर्ण नाव माहिती नाही) अशांना पोलिसांनी अटक करून कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या.जे.एस.केळकर मॅडम यांचे समोर काल हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान त्यांना गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहिती नुसार ही चोरी सुभाषनगर परिसरातील प्रमुख आरोपी समीर उमर कुरेशी (वय-25) यासह हरेगाव येथील आरोपी संतोष काळे,सोन्या (पूर्ण नाव माहिती नाही) अशांनी केली असल्याची माहिती मिळाल्याने यांनी यावर पाळत ठेवली होती.त्यानुसार तो अलगत पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.त्याला शहर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी रात्री 10 वाजता जेरबंद केले होते.त्यास दिनांक 16 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती हाती आली आहे.

  याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर आणि परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.त्यांनी रेकी करून,कोण घरी नाही अशा ठिकाणी हात मारण्यास सुरुवात केली आहे.अशीच घटना कोपरगाव शहरातील पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुभाषनगर परिसरात दिनांक 08 ऑक्टोबरच्या रात्री 1.45 वाजेच्या सुमारास घडली होती.फिर्यादी रवींद्र सुभाष शिंदे यांचे मावशीचे या उपनगरात घर असून ते आपल्या घरात झोपलेल्या असताना त्याच भागातील चोरटे समीर उमर कुरेशी,(वय-25) यासह हरेगाव येथील आरोपी संतोष काळे,सोन्या (पूर्ण नाव माहिती नाही) अशांनी संधी साधत त्या घराची रेकी करून रात्री 1.45 ते 2.15 वाजेच्या सुमारास घराची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून फिर्यादीचे मावशीला मारहाण करून त्याचे घरातील १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे सहा तोळा वजनांच्या ०४ जुन्या वापरत्या बांगडया,४५ हजार रुपये किमतीची सोन्याची दिड तोळयाची पांचाली,६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दोन तोळा वजनाच्या पिळयाच्या सहा अंगठ्या,३ लाख ८० हजार ३०० रुपयाची रोख रक्कम त्यामध्ये ५०० रुपये दराच्या नोटाचे बंडल व एक लाख रुपये,१०० रुपयाचे नोटांचे एक बंडल असा एकूण ६ लाख ६५ हजार ३०० रुपयांचा अवैज घेऊन पोबारा केला होता.त्यामुळे सुभाषनगरसह कोपरगाव शहरात खळबळ उडाली होती.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.५७९/२२६ भारतीय न्याय संहिता-2023 चे कलम  ३०९ (६),३३३,३३१ (४),३ (५) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला होता.त्याचा तपास शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती याचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे हे करत होते.

   दरम्यान त्यांना गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहिती नुसार ही चोरी सुभाषनगर परिसरातील प्रमुख आरोपी समीर उमर कुरेशी (वय-25) यासह हरेगाव येथील आरोपी संतोष काळे,सोन्या (पूर्ण नाव माहिती नाही) अशांनी केली असल्याची माहिती मिळाल्याने यांनी यावर पाळत ठेवली होती.त्यानुसार तो अलगत पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.त्याला शहर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी रात्री 10 वाजता जेरबंद केले होते.त्याला पोलिसानी आपला हिसका दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला होता.त्याने गुन्हा कबूल केला असून त्यासोबत असलेल्या आरोपींची नावे त्याने सांगितली आहे.यातील प्रमुख आरोपी समीर कुरेशी यास पोलिसांनी अटक करून कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वरिष्ठ स्तर न्या.जे.एस.केळकर मॅडम यांचे समोर काल हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यास दिनांक 16 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती हाती आली आहे.सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता प्रदीप रणशूर यांनी काम पाहिले आहे.आरोपीस जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.तपास शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती याचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे हे करत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close