सण-उत्सव
…या शहरात लाडक्या गणेशाचे जोरदार स्वागत!

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी म्हणजे महाराष्ट्राच्या घराघरांत आणि सार्वजनिक मंडपांत गणरायाचे आगमन होण्याचा दिवसअसून “गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात होणारी श्रीगणेशाची स्थापना,दहा दिवसांचा उत्सवास आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून कोपरगाव शहरात आज जवळपास 80 मंडळांनी आपल्या आराध्य गणेशाची मोठ्या उत्साहात स्थापना केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.तर याबाबतची नोंदणी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या वेबसाईटला व्यत्यय आल्याने अद्याप नोंदणी सुरु असल्याची माहिती हाती आली आहे.

श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा “शिवा” असेही म्हणले जाते.या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे.असे मानले जाते की,गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते.गणेशाला मोदक खूप आवडतात.म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो,त्याचप्रमाणे जास्वंदीचे फुल,शमी पत्री आणि दुर्वा या ही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात.

उंदीर हे गणेशाचे वाहन आहे.स्त्रीमनाचे लोकदैवत असे ही श्री गणेशाला मानतात.श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते.प्रमुख्याने माती पासूनच बनवलेल्या गणेश मूर्तिचे पूजन केले जाते.यावेळी सरकारने मातीचे गणेश मूर्तीला प्राधान्य दिले असून जलप्रदूषण टाळण्याचा प्रयत्न केला आहे.त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे.यंदा डी.जे.लेझर प्रकाश शलाका हा वादाचा मुद्दा ठरला असल्याचे उघड झाले आहे.डी.जे.डॉल्बी आदीमुळे अनेकांना बहिरेपणाचा सामना करावा लागत असल्याचे उघड झाले आहे.तर डोळ्याचे आजार निर्माण होत आहे.कोपरगाव शहर आणि तालुक्यात प्रशासनाने त्यावर निर्बंध आणले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी दिली आहे.
दरम्यान ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात आपल्या देवतेची स्थापना करण्यात आली आहे.कुठेही अनुचित प्रकार घडल्याची माहिती उपलब्ध झाली नाही.त्यामुळे याचे सर्वत्र स्वागत होत आहे.



