जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

शेतकऱ्यांनी ऊस दराबाबत जास्त आशावादी राहू नये – …या नेत्याचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (नानासाहेब जवरे)

  वर्तमानात साखरेचे दर वाढले असल्याच्या बातम्या आहेत.पण ८०-८५ टक्के साखर आपण विकली आहे.साखर कारखान्यांना सरकारने दिलेल्या कोट्याप्रमाणे साखर विक्री करावी लागते.कृत्रिम साठेबाजी झाली असल्याचे सांगून काहींनी फायदे उपटले आहे.मात्र साखर कारखान्यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही.१० लाख मेट्रिक टन कच्ची साखर सरकारने बाहेरून मागितली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस दराबाबत जास्त आशावादी राहू नये असे आवाहन करून ठिबकचे १०० रुपयांचे अनुदान धरून एफ.आर.पी.पेक्षा ४४० असा जिल्ह्यात सर्वाधिक ०३ हजार ४०० रुपयांचा दर कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आज संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कर्मवीर काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष बोलताना दिसत आहेत.

सदर प्रसंगी विक्रमी ऊस उत्पादन करणारे शेतकरी यांना पुरस्कार करण्यात आला आहे.त्यात ७१,५१,३१ हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले आहे.त्यांत १८४ मॅट्रिक टन पुरवठा करून प्रथम क्रमांक दिलीप विष्णू भुसे,निमगाव,१९६ मॅट्रिक टन उत्पादन करून तुषार बबनराव बारहाते,द्वितीय पुरस्कार,तर  जमाल मेहमूद सय्यद,सिन्नर,यांनी ७४ मॅट्रिक टन उत्पादन करून तृतीय क्रमांक मिळवला आहे.त्यावेळी त्यांनी उसाला २०० रुपये अंतिम दर देऊन अंतिम दर ठिबकचे १०० रुपयांचे अनुदान धरून एफ.आर.पी.पेक्षा ४०० इतका जास्त दर म्हणजेच एकूण ३ हजार ४०० जिल्ह्यात सर्वाधिक दर जाहीर केला आहे.

  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन –२०२५-२६ ची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आ.अशोक काळे आणि कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,माजी उपाध्यक्ष द्यानेश्वर मांजरे,बाळासाहेब कदम,विश्वास आहेर,कारभारी आगवण,किसन आवारे,कचरु घुमरे,गौतम बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते,अध्यक्ष संजय आगवण,विजय कुलकर्णी, जिनिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गोदावरी केन ट्रानपोर्टचे सुभाष गवळी,संचालक सुधाकर रोहम,सचिन रोहमारे,सुनील शिंदे,शंकरराव चव्हाण,डॉ.बर्डे,सचिन कोळपे,चंद्रशेखर कुलकर्णी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,प्रशांत घुले,प्रवीण शिंदे,राहुल रोहमारे,गोदावरी केन ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष सुभाष गवळी,आदी मान्यवरसंह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.

वार्षिक सभेसाठी उपस्थित सभासद दिसत आहेत.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कारखान्याने गत हंगामात ५० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे.०८ लाख मेट्रिक टन निर्णय करण्याचा निर्णय घेतला.आगामी काळात ३५ लाख टन निर्माती होईल असा अंदाज वर्तवला आहे.१०३ सहकारी ,१०७ खाजगी कारखाने आहे.राज्याची रिकव्हरी ०९ आहे.कारखान्याचा आढावा घेतला असता त्यांनी गाळप ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी ०६ लाख ६५ हजार मेट्रिक टन केले आहे.त्यातून ११.४१ साखर उतारा मिळाला आहे.एक क्रमांकाचा साखर उतारा असल्याचे गौरवाने सांगितले आहे.०४.६९ लाख मेट्रिक टन,३८.०५ टक्के बाहेरून ऊस आवक केला आहे.सरकारने आगामी काळात ३६७९ एफ.आर.पी.निश्चित केली आहे.मागच्या तुलनेत १०० रुपयांची वाढ शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे.आपण तीन टप्प्यात कारखान्याचे अत्याधुनिकरण केले असल्याचे सांगितले आहे.विजेचा दर ४.२५ रुपये मिळणार आहे.ती वीज शहा येथे जोडणार असल्याचे सांगितले आहे.त्यातून ऊसदराला शेतकऱ्यांना प्रति टन वाढ मिळणार असल्याचे सांगितले आहे.मध्यम विभागात आपल्याला तांत्रिक क्षमता पुरस्कार यशवंतराव चव्हाण (व्ही.एस.आय.)संस्थेच्या वतीने मिळाला आहे.आगामी काळात अत्याधुनिकतेचे काम सुरू राहणार आहे.

  सदर अहवालाला मंजुरीसाठी अर्जव करून त्यांनी सभासदांची मदत मागितली आहे.ती शेतकऱ्यांनी बिनबोभाट दिली आहे.डेस्टिलरी उत्पादन चांगले मिळत असल्याचा दावा केला आहे.४५ हजार लिटरचे स्पिरीट उत्पादन करण्यात येणार आहे.आगामी काळात ५० वर्षे भांडवली गुंतवणूक करण्याची गरज भासणार नाही असा आशावाद व्यक्त केला आहे.८४.७७ लाख मद्य बॉक्स उत्पादन घेतले असल्याचे जाहीर केली आहे.राज्यात खाजगीसह १६० मद्य प्रकल्प सुरू आहे.आता अनेकाना इथेनॉल निर्मिती अनेक कारखाने करत आहेत.स्पिरीट उत्पादन कमी करत आहे.६४.१४ स्पिरिटचा दर मिळाला असल्याचे जाहीर केले आहे.देशांतर्गत उत्पादन होऊन ३,८२६ प्रति टन उत्पादन मिळाले आहे.यात वाढ करण्याची मागणी राज्यातील साखर कारखाने करत आहेत.१० लाख मेट्रिक टन कच्ची साखर सरकारने बाहेरून मागितली आहे.त्यामुळे एक आठवडा दर वाढले होते हे मुद्दामहून सांगत आहे.जागतिक बाजारात साखरेची कमतरता आहे.राज्यातील कारखान्याचे आणि खाजगी साठे तपासले गेले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त आशावादी राहू नये असे आवाहन केले आहे.शेतकरी आणि पाऊस पाण्याबद्दल बोलताना या वर्षी पाऊस उशिरा आला असून धरणे कशीबशी भरली आहे.जुलै पासून पावसाने दडी मारली असल्याचे सांगून चिंता व्यक्त केली आहे.वर्तमानात गोदावरी कालव्यांच्या कालव्यांचे आवर्तन सुरू आहे. पण शेतकऱ्यांनी सात क्रमांकाचे फॉर्म भरून देऊन पाणी घ्यावे असे आवाहन केले आहे.पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरिपाची स्थिती गंभीर आहे.सोमवारी गणरायाचे आगमन होत असून त्यांचेकडे आपण मागणी करू असे सांगून केंद्र सरकार आणि राज्याने चांगले दर साखरेला द्यावे असे आवाहन केले आहे.०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत आगामी हंगाम सुरू करावा असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.ऊस लवकर तुटला तर त्याचा परिणाम साखर उताऱ्यावर होणार आहे.कारखान्याला निव्वळ नफा३.३१ कोटी झाला असल्याचे सांगून कारखान्यास ऑडिट वर्ग ‘ अ ‘ मिळाला असल्याचे जाहीर केले आहे.त्याचे सभासदांनी टाळ्यांचा गजरात स्वागत केले आहे.विविध ठेवीवर व्याजासह ०८ कोटी शेतकऱ्यांना देणार आहे.

कोपरगावचे राजकारणावर बोलताना त्यांनी आपल्याला आपण दिलेल्या संधीमुळे ०७ वर्षे काम करण्याची संधी मिळाली आहे.नगर मनमाड वरील सावळी विहीर ते कोपरगाव रस्ता काँक्रीटीकरण केले आहे. देर्डे फाटा ते भरवस फाटा काम मार्गी लावले आहे.मंजूर साठवण तलावाचे काम पूर्ववत केले आहे.अनेक दशके प्रलंबित असलेला वारी पूल गोदावरी नदीवर बांधला आहे.झगडे फाटा ते पुणतांबा फाटा,झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख दोनदा दुरुती केली आहे.आता त्यास १७ कोटी रुपये निधी मिळवला आहे.तो पूर्ण काँक्रीटीकरण करण्याचा आपला प्रयत्न आहे.शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र दिली आहे ग्रामीण रस्ते, तीर्थक्षेत्र विकास योजना राबवून मोठा निधी आणला असल्याचे सांगून विकास केला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन मनाला चटका लावून गेले आहे.त्यांची आठवण कायम येत राहील.

  यावेळी कारखान्याचे महाव्यवस्थापक सुनील कोल्हे यांनी गतकाळात दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,साहित्यिक,शास्त्रज्ञ,कारखान्याचे सभासद,नागरिक आदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  प्रारंभी माजी आ.अशोक काळे यांचा सत्कार माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला आहे.कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांचा माजी संचालक रवींद्र जाधव यांनी सत्कार केला आहे.


  यावेळी प्रास्ताविक आ.काळे यांनी केले तर विषयपत्रिका आणि अहवाल वाचन यांनी केले आहे.तर सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष दिनार कुदळे यांनी मानले आहे.

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या परखड बातम्या वाचण्यांसाठी *’न्यूजसेवा’* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा. https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close