धार्मिक
समाजात अहंभाव फोफावत चालला आहे…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
संवत्सर (शिवाजी गायकवाड)
“वर्तमान धावपळीच्या युगात माणूस एकमेकांचा परस्परांविषयीचा आदरभाव माणूस विसरत चालला असून अहंभाव मात्र फोफावत चालला असल्याचे परखड प्रतिपादन बोलकी येथील ह.भ.प.भानुदास महाराज बोलकीकर यांच्या काल्याच्या किर्तनात बोलताना केले आहे.

“वैकुंठवासी रामदासी महाराज व नामदेवराव परजणे यांनी सुरु केलेल्या हरिनाम सप्ताहाच्या नियोजनासाठी व हा सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी जे परिश्रम घेतले ते निश्चितच कौतुकास्पद आहे.कोणताही जातीभेद किंवा राजकीय विचार मनात न आणता सर्वजण एकत्र येऊन सप्ताह पार पाडतात ही संवत्सरची खरी संस्कृती आहे”-राजेश परजणे,अध्यक्ष गोदावरी परजणे तालुका सरकारी दूध उत्पादक संघ.
महाराष्ट्रामध्ये सात दिवस देवाचे नामस्मरण करून गावोगावी साजरा केला जाणारा अखंड हरिनाम सप्ताह ही वारकरी संप्रदायाची एक अत्यंत पवित्र आणि जुनी परंपरा आहे.हा सोहळा सलग सात दिवस चालतो.रामनवमी,गोकुळाष्टमी,किंवा कार्तिक व आषाढ वारीसारख्या पवित्र काळात त्याचे आयोजन होते.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथेही ही परंपरा मोठ्या भक्तीभावाने पाळली जात आहे.सद्गुरू रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्व.नामदेवराव परजणे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४५ वर्षाहून अधिक काळापासून संवत्सरगांवात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील अखंड हरिनाम सप्ताहाची आज रोजी दहीहंडी फोडून मोठ्या उत्साहात सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते.

सदर सांगता समारंभात गोदावरी सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण साबळे,चंद्रकांत लोखंडे,खंडू फेपाळे,लक्ष्मण परजणे,भरत बोरनारे,दिलीप ढेपले,सोमनाथ निरगुडे,अनिल आचारी,फकिर बोरनारे,बाळासाहेब दहे,अविनाश गायकवाड,ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव,दिलीप तिरमखे,काका गायकवाड,बापू गायकवाडआदी प्रमुख मान्यवरांसह राजेश आबा परजणे फौन्डेशन व मित्रमंडळाच्या सदस्यांसह नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय, जनता हायस्कूल,जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींनी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना म्हणाले की,”स्व.नामदेवराव परजणे यांच्या आदर्श जीवनाविषयी माहिती दिली.परजणे यांनी संवत्सर गावासाठी हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जतन करुन ठेवलेली आहे.तीच परंपरा त्यांचे चिरंजीव राजेश परजणे यांनी पुढे चालू ठेवली आहे ही खरोखरच कोतुकाची बाब आहे.परजणे यांच्या आदर्श वाटचालीचा प्रत्येकाने अंगिकार केला तर जीवनात सफलता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.सामाजिक कार्याचा मोठा वारसा परजणे यांनी घालवून दिलेला आहे.तो सर्वांनीच पुढे चालू ठेवावा असेही मार्गदर्शन भानुदास महाराज यांनी यावेळी केले आहे.
बोलकी येथील ह.भ.प.बोलकीकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर आमटी भाकरीच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली आहे.यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.भजन,किर्तन,श्रीकृष्ण चरित्र आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी गेले सात दिवस संवत्सरगांव गजबजून गेले असल्याचे आढळून आले आहे.
सप्ताह कालावधीत संवत्सरसह कोकमठाण,सडे,वारी,कान्हेगांव,धोत्रे,भोजडे,खोपडी,दहेगाव बोलका,लौकी,तळेगांव मळे,घोयेगांव,उक्कडगांव,कासली,शिरसगांव,तिळवणी,पढेगांव आदी गांवातील भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला आहे.संवत्सर परिसरातील रामवाडी,लक्ष्मणवाडी,दशरथवाडी,बिरोबा चौक या ठिकाणच्या भजनी मंडळांनी रात्रंदिवस पहारा दिला आहे.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश आबा परजणे फौन्डेशन व मित्रमंडळाच्या सदस्यांसह नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय,जनता हायस्कूल,जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींनी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी परिश्श्रम घेतले.शेवटी ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.



