शैक्षणिक
…या शाळेत जागतिक पत्रलेखन दिन साजरा

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (ए.आय.) मुलांना सर्व माहिती मोबाईल वर मिळते हे जरी फायद्याचे असले तरी प्रत्यक्षात नकळतपणे विद्यार्थ्यांच्या विचार शक्तीचा,कल्पनाशक्तीचा ऱ्हास होत चालला आहे.याचा विचार करून नगरपालिका शाळा.क्र.5 बेट कोपरगाव या शाळेतील शिक्षकांनी “जागतिक पत्रलेखन” या दिवसाचे निमित्त साधून विद्यार्थ्यांसाठी पोस्टकार्ड वर पत्रलेखन स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित केली होती.

जागतिक पत्रलेखन दिन दरवर्षी १ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.हा दिवस २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन लेखक आणि चित्रकार रिचर्ड सिम्पकिन यांनी सुरू केला.डिजिटल युगात हाताने पत्र लिहिण्याची कला आणि त्यातील भावना जिवंत ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.हातात पेन घेऊन कागदावर उतरवलेले शब्द वाचकापर्यंत वेगळाच जिव्हाळा आणि आपलेपणा पोहोचवतात.मात्र ही कला वर्तमानात लोप पावत चालली आहे.
जागतिक पत्रलेखन दिन दरवर्षी १ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.हा दिवस २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन लेखक आणि चित्रकार रिचर्ड सिम्पकिन यांनी सुरू केला.डिजिटल युगात हाताने पत्र लिहिण्याची कला आणि त्यातील भावना जिवंत ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.हातात पेन घेऊन कागदावर उतरवलेले शब्द वाचकापर्यंत वेगळाच जिव्हाळा आणि आपलेपणा पोहोचवतात.मात्र ही कला वर्तमानात लोप पावत चालली आहे.त्यामुळे हाच उद्देश समोर ठेवून कोपरगाव शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक 05 मधील शिक्षकांनी पत्रलेखन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी स्पर्धा घोषित झाल्यावर प्रत्यक्ष पत्र लिहायचे कोणाला ? हा प्रश्न उभा राहिला होता त्यावेळी हे पत्र फक्त आई,वडिल,असा विषय न ठेवता विद्यार्थ्यांना आवडेल अशा पाऊस,झाड,पक्षी,प्राणी यांना तसेच सचिन तेंडुलकर,विराट कोहली यांना पत्र लिहू शकता असे सांगण्यात आले.पत्रलेखन संबंधी नियम सांगण्यात आले.वेगवेगळ्या व्यक्तींना पोस्टातून आणलेलं पत्र लिहिण्याचे मुद्दे व आशय समजावून सांगण्यात आला.त्यावर कोठे काय लिहायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यानी आपल्या हस्ताक्षरात पत्र लिहिले.या उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी,शिक्षक सुनील रहाणे व नसरीन पठाण यांनी मार्गदर्शन करून परिश्रम घेतले.
या उपक्रमाचे कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी अजित निकत,शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी संजीवनी अंबिलवादे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आदींनी कौतुक केले आहे.



