जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यक्ती विशेष

माजी खा.बडदे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार भिमराव बडदे यांच्या ७९ व्या जयंती सप्ताहानिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण आणि पालकत्व अभियानाचा शुभारंभ रविवार,दि.२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर चौक,कोपरगांव येथे संपन्न होणार आहे.अशी माहिती ज्येष्ठ मार्गदर्शिका नानीसाहेब बडदे यांनी दिली आहे.

माजी खा.स्व.भिमराव विष्णूजी बडदे यांचे छायाचित्र.

  माजी खा.स्व.भीमराव बडदे कोपरगाव वकील संघाचे माजी  अध्यक्ष होते.त्यांनी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली होती.सन-१९९६च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रभावी वकृत्वाने अनेक निवडणूक सभा गाजवल्या होत्या.परिणामी ते पहिल्याच निवडणुकीत विजयी होऊन थेट लोकसभेत पोहचले होते.त्यामुळे त्यांचे नाव देश आणि राज्यभर गाजले होते.मात्र देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मुदतपूर्व राजीनाम्याने त्यांना अल्पकाळ मिळाला होता.

     माजी खा.स्व.भिमराव विष्णूजी बडदे हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते.ते १९९६ मध्ये महाराष्ट्रातील कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून मुरब्बी राजकारणी माजी खा.स्व.शंकरराव काळे यांचा पराभव करून खासदार म्हणून बहुमताने निवडून आले होते.त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९४७ रोजी झाला होता.त्यांचे संपूर्ण कुटुंब आधी जनसंघ नंतर राष्ट्रीय सव्यंसेवक संघ,आणि नंतर भाजपशी जोडले गेले होते.त्यांनी 1978 साली आणीबाणीच्या काळात कारागृहाची शिक्षा भोगली होती.त्यांनी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली होती.सन -१९९६च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रभावी वकृत्वाने अनेक निवडणूक सभा गाजवल्या होत्या.परिणामी ते पहिल्याच निवडणुकीत विजयी होऊन थेट लोकसभेत पोहचले होते.त्यामुळे त्यांचे नाव देश आणि राज्यभर गाजले होते.मात्र पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वाभिमानाने मुदतपूर्व राजीनामा दिल्याने यांचे सरकार गडगडले होते.आणि देशात नव्याने लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या.त्यामुळे खा.बडदे यांना अल्पकाळ मिळाला होता.मात्र या अल्प काळात त्यांनी कोपरगाव लोकसभा मतदार संघाचे अनेक प्रश्न मार्गी लावले होते तर अनेक प्रश्नांना संसदेत वाचा फोडली होती.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे समवेत माजी खा. स्व.भीमराव बडदे.

  स्व.बडदे यांनी आयुष्यभर संघर्ष,समाजसेवा आणि शेतक-यांसाठी लढा दिला होता.त्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी दिनांक 02 ऑगस्ट रोजी कोपरगांव शहरातील शालेय विद्यार्थ्यांना ५०० देशी वृक्ष रोपांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.हा कार्यक्रम लोकनेते माजी खा.भिमराव (नाना) बडदे 79 वी जयंती सप्ताह समिती आणि धर्मयोद्धा माजी खासदार ॲड.स्व.भिमराव (नाना) बडदे स्मृति प्रतिष्ठान,महाराष्ट्र प्रांत,शाखा कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.पर्यावरण संवर्धन हा यंदाच्या जयंती सप्ताहाचा मुख्य उद्देश असून १ ऑगस्ट २०२६ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वृक्षारोपण,रोपांचे वाटप आणि पर्यावरण जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रमुख सुशांत घोडके यांनी दिली आहे.माजी खा. बडदे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा” असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.या कार्यक्रमास सर्व राजकीय,सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close