जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

ज्ञानेश्वर गोसावी यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 
   कोपरगाव शहरातील जुन्या तहसील कार्यालयाजवळ रहिवासी असलेले सरकारी ठेकेदार व शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर गोसावी यांच्या मातोश्री उषादेवी अंबरगीर गोवासी (वय-90) यांचे आज दुपारी 3.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर आज रात्री 9.30 वाजता शोकाकुल वातावरणात कोपरगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

स्व.उषादेवी गोसावी यांचे छायाचित्र.

  स्व.उषादेवी गोसावी या अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाचा म्हणून कोपरगाव आणि परिसरात परिचित होत्या.त्यांनी आपले पती अंबरगिर गोसावी यांचे सन – 2007 साली निधन झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.त्यांनी आपल्या मुलांना मोठ्या कष्टाने शिक्षित आणि संस्कारित केले होते.त्यांच्या निधनाने शिर्डीचे लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,आ.विवेक कोल्हे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राजेंद्र झावरे,संजय सातभाई,माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,भाजपचे सोशल मिडिया सेलचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख समीर आंबोरे,नगरसेवक विक्रम सातभाई आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या पश्चात अरुण गोसावी,ज्ञानेश्वर गोसावी,विलास गोसावी आदी मुले आहेत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close