जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार,तिघांवर गुन्हा,एक फरार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत काल सायंकाळी 06 वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीवर एकाने शारीरिक अत्याचार करून त्यास दोघांनी सहकार्य केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.या आरोपी विरुद्ध तालुका पोलिसांनी पॉक्सो कलमान्वये आरोपी अनिल किसन काकडे,सुनील किसन काकडे व नितीन छगन काकडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यातील पहिल्या दोघांना पोलिसांनी अटक केली असली तरी नितीन काकडे हा आरोपी पोलिसांच्या हाती तूरी देऊन पसार झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सर्व संकल्पित छायाचित्र.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत काल सायंकाळी 06 बाजेच्या सुमारास एक घटना एका शेतात घडली असून यातील आरोपी अनिल किसन काकडे,सुनील किसन काकडे व नितीन छगन काकडे आदी तीन आरोपींनी असा गुन्हा केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे एका आरोपीने सदर मुलीवर बलात्कार केला असून एकाने त्याचे आपल्या भ्रमणध्वनीवर चित्रीकरण केले आहे.या घटनेची सर्वत्र निंदा होत आहे.

   बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये (पोस्को) होणारी वाढ अत्यंत चिंताजनक आहे.बहुतांश घटनांमध्ये आरोपी हा ओळखीचा किंवा जवळचा नातेवाईक असतो,ज्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.वाढत्या गुन्ह्यांमुळे १८ वर्षांखालील बालकांच्या संरक्षणासाठी कडक पावले उचलणे काळाची गरज बनले आहे.या गुन्ह्यांची तीव्रता लक्षात घेऊन न्यायालयाने गुन्हेगारांना आजन्म जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षा सुनावल्या आहेत.१८ वर्षांखालील कोणत्याही बालकासोबत संमतीने किंवा विनासंमतीने झालेला लैंगिक संपर्क हा दखलपात्र गुन्हा मानला जातो.यात बाल अश्लील साहित्य बाळगणे किंवा पाहणे यांसारखे गुन्हे देखील समाविष्ट आहेत.असे असताना या गुन्ह्यात काही कमी येण्याची चिन्हे दिसत नाही हे विशेष! कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत काल सायंकाळी 06 बाजेच्या सुमारास एक घटना एका शेतात घडली असून यातील आरोपी अनिल किसन काकडे,सुनील किसन काकडे व नितीन छगन काकडे आदी तीन आरोपींनी असा गुन्हा केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे एका आरोपीने सदर मुलीवर बलात्कार केला असून एकाने त्याचे आपल्या भ्रमणध्वनीवर चित्रीकरण केले आहे तर तिसऱ्या आरोपीने सदर ठिकाणी कोणी येत आहे का याची राखणदारी केली असल्याची बाब उघड झाली आहे.

  दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना रात्री 11.15 वाजता मिळाली होती.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थळ पंचनामा केला आहे.व तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पहिल्या दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.यातील अनिल किसन काकडे याने फिर्यादी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध केले असून तिला दुखापत केली आहे.यातील दुसरा आरोपी आरोपी नितीन छगन मोरे याने त्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी दिली असल्याचे उघड झाले  आहे.तर सुनील किसन काकडे याने सदर घटनास्थळी कोणी येणार नाही याची दक्षता घेण्यासाठी राखणदार म्हणून निंदनीय काम केले असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान यातील अनिल काकडे व सुनील काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.तर तिसरा आरोपी नितीन छगन मोरे हा घटना स्थळावरून फरार झाला असल्याची माहिती हाती आली आहे.

   दरम्यान शिर्डी पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती,कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आदींनी भेट दिली आहे.या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.260/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(2)(आय)70(2),77,115,(2) पॉक्स कलम 4,6,12,13,17 आय. टी.ऍक्ट कलम 66) ई) 67(बी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी भरती यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप कोळी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close