कोपरगाव शहर वृत्त
नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांचा दावा म्हणजे,”एरंडाचे गुऱ्हाळ”

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद सत्ताधारी गटाची पत्रकार नुकतीच त्यांच्या पहिल्या शंभर दिवसातील कामांची संपन्न झालेली पत्रकार परिषद परिषद म्हणजे,”एरंडाचे गुऱ्हाळ” असल्याचा आरोप राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेत गत शंभर दिवसात एकही ठोस काम झालेले नाही.नगरपरिषद पदाधिकारी नापास झाले आहे.नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणगान काय करणार ?त्यांनी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या कामावरच पत्रकार परिषद घेऊन आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या आहे.ढापे टाकण्याचा बनाव त्यातून प्रकट झाला आहे”-वाल्मीक अहिरे,राष्ट्रवादी आ.काळे गट नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत चार महिन्यांच्या (सुमारे १०० दिवस) कामकाजाचा व विकासाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला.या कार्यकाळात कोपरगाव पालिकेचे आर्थिक नुकसान भरून काढणे,गटारीवर ढापे बसवणे,स्वच्छता,आणि मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला असल्याचा दावा केला होता.शहरामध्ये वर्षातून ७ ते ८ वेळा औषध फवारणी करण्याचे नियोजन नवीन टेंडर्समध्ये करण्यात आले असण्याबरोबरच.शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार शहरात ७५ अद्ययावत स्वच्छतागृहे (टॉयलेट्स) बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.विरोधकांनी अल्पावधीतच हिशेब मागण्यास सुरुवात केल्यावर,नगराध्यक्षांनी विरोधकांना स्वतःच्या कथित चार हजार कोटींच्या कामांचा हिशोब देण्याचे आव्हान दिले असल्याने त्यावर आज अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवक आदींनी गौतम बँकेच्या एका सभागृहात पत्रकार परिषद घेऊन या सत्ताधारी गटाचा या दाव्याचा पोलखोल केला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे गट नेते गौरी मंदार पहाडे,शैलेश साबळे,मेहमूद सय्यद,बाळासाहेब रुईकर,वाल्मीक लाहिरे,इम्तियाज अत्तार,सोमनाथ आढाव,संदीप कपिल,विजय त्रिभुवन आदीं मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी भाजप कोल्हे गटाकडून गत शंभर दिवसात एकही ठोस आणि जनहिताचे काम झालेली नाही असा आरोप केला आहे.त्याबाबत भाजप नगराध्यक्ष पराग संधान आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांनी कितीही गप्पा मारल्या तरी त्यामुळे जमिनीवरील वास्तव बदलले नसल्याचा दावा केला आहे.त्याबाबत शंभर दिवसात नगरपरिषद पदाधिकारी नापास झाले आहे.नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणगान काय करणार ? असा सवाल निर्माण केला आहे.त्यांनी लोकनियुक्त आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या कामावरच पत्रकार परिषद घेऊन आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या असल्याचा आरोप केला आहे.त्यासाठी नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाने आपल्या पत्रकार परिषदेत ७५० ढापे बसवले असल्याचा दावा केला होता.मात्र सिद्धी विनायक मंदिर,गणपती मंदिरासमोर,टिळक नगर गणपती मंदिर असे तीन कामे दाखवले असले तरी प्रत्यक्षात सर्व ठिकाण एकच असल्याचा पोलखोल केला आहे.त्यामुळे ही घोषणा फसवी असल्याचा दावा केला असल्याची माहिती त्यांनी नगरपरिषदेकडून अधिकृतरित्या मागवलेल्या माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे.त्यामुळे नगराध्यक्ष पराग संधान यांची पत्रकार परिषद ही एरंडाचे गुऱ्हाळ असल्याचा दावा केल्याने सत्ताधारी गटाची अधिकृतरित्या विरोधी गटाने हवा काढल्याचे नागरिकांत बोलले जाऊ लागले आहे.आता आगामी काळात भाजप कोल्हे गट काय भूमिका घेतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.



