आंदोलन
पर्यायी रस्त्याचा बट्ट्याबोळ,ग्रामस्थ संतप्त,आंदोलनाचा इशारा !

न्यूजसेवा
कोपरगाव-संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ईशान्येकडील कोपरगाव-वैजापूर आणि जुन्या नागपूर रस्त्याला जोडणारा आणि संवत्सर,कान्हेगाव,वारी,भोजडे,धोत्रे गावातील दळणवळणासाठी महत्वाचा ठरणारा श्री साईबाबा कॉर्नर,संजीवनी कारखाना ते संवत्सर या मार्गाची पुरती वाट लागली आहे.म्हणून अवजड वाहनधारक आदिवासींसाठी बनवलेल्या व औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचा वापर करत असल्याने मनाई वस्ती रस्त्याची पुरती वाट लागली असून त्यात अपघात होऊन त्यात दशरथवादी येथील युवक सनी वाघ हा गंभीर जखमी झाल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ग्रामस्थानी आणि तहसीलदारांना जाब विचारला असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

संग्रहित छायाचित्र.
“राज्यातील ग्रामीण भागातील नादुरुस्त रस्ते ही एक गंभीर समस्या बनली आहे,ज्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.खराब रस्ते,खड्डे आणि तुटलेले पूल यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो आणि सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो वर्तमानात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर आणि पूर्वेकडील गावे याचा सामना करत आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नगर मनमाडसह अन्य रस्त्यांची दुरावस्था सांगण्याची गरज नाही.त्यात भर म्हणून झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्यावर रोजच बळी जात आहे.मुरूम आणि खडी टाकून महिना होत नाही तोच पुन्हा त्याचा बट्ट्याबोळ झाला आहे.आणि पुन्हा एकदा,” येरे माझ्या मागल्या…! सारखी स्थिती उद्भवली आहे.याचे सोयर सुतक कोणालाही नाही.हा बट्ट्याबोळ कमी की काय आता थेट संजीवनी सहकारी साखर कारखान्याला साधणारा आणि पुढे संवत्सर आणि पूर्वेकडील गावांना जोडणारा रस्ता म्हणून ज्याची ओळख आहे त्या रस्त्यावरून जाणे म्हणजे थेट मी मृत्यूला निमंत्रण देणे ठरत आहे.त्या मार्गावर मोठ्या संख्येने अपघात घडत आहे.अनेकजण जयबंदी होत आहे.त्यात जीवितहानी वेगळीच आहे.त्यामुळे नागरिक,शेतकरी अवजड वाहनधारक आणि प्रवासी त्या रस्त्याने जाण्याचे धाडस करेनासे झाले आहे.त्यातच संवत्सर ग्रामपंचायतीने आदिवासी वस्ती असलेल्या मनाई वस्ती येथील ग्रामस्थांना एकेरी डांबरीकरण रस्ता केला आहे.ते रस्ता होण्याची आणि इकडील रस्ता मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त होण्याची एकच वेळ झाली असल्याने अवजड वाहतूकदार आणि प्रवासी वाहने त्याच मार्गाने धावत आहे.परिणामी त्या रस्त्यावरून वाहनांची प्रचंड गर्दी वाढलीआहे.परिणामी जो परिणाम व्हायचा तो होऊ लागला असून अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे.दोनच दिवसापूर्वी दशरथ वाडी येथील युवक त्याच रस्त्याने जात असताना त्याला एका अवजड वाहनाने धडक दिल्याने व त्या वाहनाने महावितरण कंपनीची विद्युत तार तोडल्याने हा अपघात झाला आहे.त्यात सनी वाघ हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे.त्यामुळे संवत्सर ग्रामस्थांचा असंतोष प्रकट झाला आहे.त्यांनी आज तहसीलदार कार्यालयाकडे धाव घेऊन निवेदन दिले आहे.

दरम्यान कोपरगाव तहसील प्रशासनास दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,”संवत्सर येथून मनाई मार्ग औद्योगिक वसाहत ग्रामीण मार्ग ४४ (प्रजिमा ४) या चार कि.मी.अंतराच्या रस्त्यावरुन गेल्या दान ते अडीच महिन्यांपासून जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु झालेली आहे.जड व मोठ्या वाहनांच्या वापरासाठी हा रस्ता नसतानाही ट्रक्स,वाळू व डबर वाहतूक करणारे डंपर,ट्रॅव्हल बसेस,राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस,जेसीबी वाहने,खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने अशी हजारो वाहने रात्रंदिवस या रस्त्यावरुन ये जा करीत असल्याने रस्त्याची वाताहत झाली आहे.गेल्या काही महिन्यापूर्वीच दुरुस्त करण्यात आलेला हा रस्ता जड वाहतुकीमुळे जागोजागी खचला आहे.मोठ मोठे खड्डे पडले आहेत.रस्त्याच्त्या साईडपट्ट्या उघड्या पडल्या आहेत.परिणामी दुकाकीस्वार व पादचारी प्रवाशांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला आहे.

दरम्यान या रस्त्यावरच जिल्हा परिषदेची शाळा असल्याने लहान मुलांचाही रस्त्यावरुन सतत वावर असतो.मुळात हा रस्ताच अरुंद असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात दररोज होत आहेत.या परिस्थितीचे गांभिर्य विचारात घेऊन या रस्त्यावरुन होणारी जड वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी.फक्त हलकी वाहने व दुचाकी वाहनांनाच रहदारीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे केली आहे.सरकारने या मागणीकडे दुर्क्षक्ष केल्यांस व अपघात होऊन जीवित हानी झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शेवटी राजेश परजणे यांनी दिला आहे.
सदर प्रसंगी निवेदनावर गोदावरी-परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांचेसह लक्ष्मण साबळे,कर्मवीर काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब बारहाते,बाजार समितीचे माजी उपसभापती गोवर्धन परजणे,संचालक दिलीप बोरनारे,माजी उपसरपंच विवेक परजणे,अविनाश गायकवाड,अनिल शिंदे,संभाजी शिंदे,रामदास पवार,राजेंद्र खर्डे,अजिंक्य परजणे,अरविंद जगताप,सोमनाथ घेर,पोपट बोरनारे,कैलास कासार,ॲड.शिरीषकुमार लोहकणे,शांताराम परजणे,अनिल आचारी,सोमनाथ निरगुडे आदींच्या सह्या आहेत.



